मिशन कर्मयोगीच्या प्रशिक्षणातून शासकीय योजना, निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करावी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : शासन सर्वसामान्यांसाठी विविध निर्णय, योजना राबवित असते. मंत्रालयीन अधिका-यांनी कर्मयोगी भारतच्या मिशन कर्मयोगी प्रशिक्षणातून या शासकीय योजना, निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले. एल्फिंस्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने मंत्रालयीन सहसचिव, उपसचिव यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात श्रीमती सौनिक बोलत होत्या. यावेळी कर्मयोगी भारतचे समन्वय अधिकारी विजय अहेर, प्रकल्प व्यवस्थापक राकेश वर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, कर्मयोगीच्या प्रियंका अग्रवाल आदींसह मंत्रालयातील सहसचिव, उपसचिव उपस्थित होते.

एल्फिंस्टन विद्यालयाचा इतिहास सांगून श्रीमती सौनिक म्हणाल्या की, शासकीय योजना, निर्णय, कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिका-याला त्या योजनेची संपूर्ण माहिती हवी. आपले काम प्रामाणिकपणे गुणवत्तापूर्ण केल्यास वैयक्तिक जीवनातही लाभ होतो. काही अधिकाºयांकडे माहिती भरपूर असते, मात्र ती कागदावर योग्य पद्धतीने उतरत नाही,यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी आहे. प्रत्येक काम कळकळ, मेहनत, समजुतीने पार पाडा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रारंभी समन्वय अधिकारी श्री. अहेर यांनी मिशन कर्मयोगीबाबत माहिती दिली. अधिकाºयांनी कौशल्य, क्षमता, इच्छा या गोष्टी आत्मसात करायला हव्यात, असे त्यांनी सांगितले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सादरीकरण करण्यातआले. उपसचिव मंजुषा कारंडे यांनी कौशल्य विकास विभागाबाबत तर श्री. दळवी यांनी व्यवसाय प्रशिक्षण व प्रशिक्षणाबाबतची माहिती दिली.

यावेळी आयजीओटी या कर्मयोगीच्या प्लॅटफॉर्मवर आॅनलाईन प्रशिक्षणाची तयारी करण्यात आली. सर्व अधिका-यांचे डिजीटल आयडी तयार करण्यात आले. त्या आयडीद्वारे लॉगीन करून अधिका-यांना शासकीय विविध प्रशिक्षणाची द्वारे खुली झाली. याद्वारे अधिका-यांना संवाद, अर्थविषयक, ताण-तणाव, योजनांची अंमलबजावणी, निर्णय तयार करतानाच्या येणाºया अडचणीबाबतचे आॅनलाईन प्रशिक्षण घेता येणार आहे. प्रशिक्षणानंतर अधिकाºयांच्या शंकांचे निरसन श्रीमती अग्रवाल यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.