सनीज् स्प्रिंगडेल शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नुकत्याच घोषीत झालेल्या १०वी सि. बी. एस. ई. बोर्डाच्या निकालात सनीज् स्प्रिंगडेल शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन आपली १०० टक्के निकाल देण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे. अस्मी गेडाम हिने शाळेतुन प्रथम स्थान पटकावले आहे तसेच द्वितीय क्रमांकावर नुपुर कुळकर्णी ही असुन तृतीय क्रमांकावर दोनविद्यार्थीनीनी बाजी मारली आहे.

त्यात शुभदा शेंडे व कुशाग्रा शर्मा ह्या विद्यार्थीनी आहेत. तसेच १२ वी सि.बी.एस.ई. बोर्डाच्या निकालही नुकताच घोषीत झाला असून कौस्तुभ भोवते याने शाळेतुन प्रथम स्थानपटकावले आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे संचालक खासदार सुनील मेंढे, कोषाध्यक्षा श्रीमती शुभांगी मेंढे, अजित आष्टीकर, विनय अंबुलकर, अनंत आष्टीकर, श्रीमती डॉ. कांचन आष्टीकर तसेच शाळेच्या प्राचार्या शेफाली पाल, के. जी. प्रमुख कल्पना जांगडे, प्रायमरी प्रमुख समृध्दी गंगाखेडकर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी अभिनंदन केले असून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.