रासायनिक खताचा तुटवडा संपवायला भंडा-यात रॅक पॉईंट द्या!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गेल्या अनेक वर्षा पासून भांडार जिल्ह्याच्या शेतक-यांना खताचा तुटवडा सहन करावा लागत आहे. उपमुख्यमंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हल्लीच झालेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी वरील समस्याला पुन्हा एकदा वाचाफोडत भंडारा जिल्ह्य करिता तुमसर येथे रॅक पॉईंट देण्याची मागणी केली. ज्या मागणीला पालकमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सकारात्मक उत्तर देत रेल विभागाला लवकरच तुमसर येथे जमीन अधिग्रहणाची सूचना देण्याचे आश्वासन दिले.

भंडारा जिल्ह्यात धान पिकांची शेती अधिक प्रमाणात केली जाते. ज्यात काही क्षेत्र असे आहे की, त्या क्षेत्रातिल शेतकरी वर्षातून तीन वेळा धानाचे पीक घेतात. परंतु भंडारा जिल्ह्यातील शेतकºयाला गेल्या अनेक वर्षापासून दर वर्षी रासायनिक खतांच्या तुटवड्याला सामोरी जावे लागते. ज्याचे एक मोठे कारण हे आहे की, रेल विभागाची रॅक पॉईंट ही गोंदियाला असल्यामुळे गोंदियातील व्यापारी सर्व प्रथम आवश्यकते अनुसार खतांची उचल करून घेतात आणि भंडारा जिल्ह्यातील शेतक-यांना खताचा तुटवडा सोसावा लागतो.

आ. भोंडेकर यांनी आठवण करून दिली की, २००९ साली आमदार झाल्यावर त्यांनी भंडारा जिल्हयाकरिता तुमसर येथे रॅक पॉईंट देण्याची मागणी केली होती, जी आजपर्यंत पूर्ण न होऊन प्रलंबित पडली आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांची व्यथा लक्ष्यात घेता तुमसर येथे जागा अधिग्रहित करून रॅक पॉईंट बनविण्याची मागणी पुन: एकदाआमदार भोंडेकर यांनी पालकमंत्री फडणवीस यांच्या समक्ष ठेवली. ज्यावर पालकमंत्री यांनी सकारात्मक उत्तर देत लवकरच रॅक पॉईंट उभरण्याचे आश्वासन दिले आणि रेल विभागाला तुमसर येथे रॅक पॉईंट करीता भूमी अधिग्रहीत करण्याची सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.