जिल्हाधिकाºयांनी घेतला तालुकास्तरीय जलयुक्त शिवार २.० चा आढावा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील विभागांनी जलयुक्त शिवार २.० अंतर्गत केलेल्या तालुका निहाय व यंत्रणा निहाय कामाचा आढावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे दुरदृष्यप्रणालीद्वारे घेतला. या अभियानात कृषि, जलसंपदा, वन यांच्यासह अन्य संबंधित यंत्रणांनी १९ मे नंतर जास्तीत जास्त कामे सुरू करावी. ग्रामसभेमध्ये मंजूर झालेला आराखडा तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झाल्याची खातरजमा संबंधीत विभागाच्या अधिका-यांनी करावी.

तसेच उर्वरीत आराखडा ग्रामसभेमधून मंजूर करून समितीकडे पाठविण्यात यावा. जलयुक्त शिवार योजना अंतर्गत मंजूर कामाचे अंदाज पत्रके तातडीने सादर करून मंजूर कामे तात्काळ सुरू करण्याच्या सुचना यावेळी जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी अधिका-यांना केल्या. या जलयुक्त शिवार २.० बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, नियोजन अधिकारी श्री. बोरकर, कृषी अधिक्षक अधिकारी संगीता माने, कार्यकारी अभियंता अनंत जगताप व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.