…म्हणून मुलाने कुऱ्हाडीचे घाव घालून केला वडिलांचा खून

प्रतिनिधी चंद्रपूर : वडील घरी आईला व बहिणीला नेहमी त्रास देतात. याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांच्या डोक्यात कुºहाडीचा घाव घालत ठार केले. ही धक्कादायक घटना चंद्रपूर तालुक्यातील चोरगाव येथे घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला दुगार्पूर पोलिसांनी अटक केली आहे. श्रावण चौधरी (वय ४८ वर्षे), असे मृताचे नाव असून नागेश (वय २६ वर्षे) असे आरोपी मुलाचे नाव आहे. श्रावण चौधरी हे पत्नी, मुलगा व मुलीसह चोरगाव येथे राहत होते. त्यांची मुलगी नागपूर येथे तर मुलगा चेन्नई येथे कामानिमित्त राहतात. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे दोघेही आपल्या घरी परत आले होते. श्रावण चौधरी हे पत्नी, मुलगा व मुलीशी नेहमी भांडण करत होते. रविवारी (दि.५ जुलै) देखील ते पत्नी व मुलीसह भांडत असताना मुलगा नागेश याला राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात त्याच्या वडिलांच्या डोक्यात कुºहाडीने घाव घातले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी दुगार्पूर पोलिसांनी नागेश चौधरी यास अटक केली. सोमवारी (दि. ६ जुलै) त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *