सीबीएससी बोर्डाची यंदाच्या वर्षीच्या अभ्यासक्रमासंदर्भात महत्त्वाची घोषणा

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (सीबीएससी) यंदाच्या शैक्षणिक वषार्साठी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. करोना व्हायरसमुळे सीबीएसई बोडार्ने २०२०-२१ या शैक्षणिक वषार्साठी नववी ते १२ वी इयत्तेचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी करण्याचा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देशातील आणि जगातील सध्याची असाधारण परिस्थिती लक्षात घेऊन, सीबीएसईला नववी ते १२ इयत्तेपर्यंतच्या अभ्यासक्रम कमी करण्याचा सल्ला दिला होता असे डॉ. रमेश पोखरीयाल यांनी सांगितले. ते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत.

अभ्यासक्रम कितपत कमी करण्यात आलाय, तो शिक्षकांना विद्यार्थ्यांना समजावून सांगावा लागेल. अभ्यासक्रम कमी करण्यासंदर्भात देशभरातील शिक्षण तज्ज्ञांकडून १५०० सल्ले मिळाल्याचे पोखरीयाल यांनी सांगितले. यापूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी एप्रिल महिन्यात अशीच योजना तयार केली होती. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडे यंदाच्या शैक्षणिक वषार्साठी ३० टक्के अभ्यासक्र म कमी करण्याची शिफारस केली होती. मार्च महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन सुरु झालं. देशात आता अनलॉक २ सुरु आहे. पण शाळा, कॉलेजस, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजूनही सुरु झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे दिवस वाया जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *