गणेशपुर येथील मैदानाची भूमाफियांकडुन सुटका करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील गणेशपुर येथील मिशन ग्राउंड येथे उपविभागीय अधिकारी भंडारा यांना गट क्रमांक १२७ च्या अकृषक परवानगी अर्ज सादर करण्यात आला आहे. ग्रामस्थांना व शाळेतील विद्यार्थ्यांना आणि खेळाडू ला वापरण्यात येणारे ग्राउंड हे नियमित लोकहिताचा कामाकरिता रहावे याकरिता जिल्हाधिकारी भंडारा यांना गणेशपूर येथील ग्रामस्थांच्या याच्या वतीने आज दिनांक १६ मे २०२३ रोजी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जनसेवक पवन मस्के यांनी पुढाकार घेतला मिशन ग्राउंड वरील जागा युनायटेड चर्च आॅफ इंडिया ट्रस्ट असोसिएशनची असून अभिलेखात देखील नमूद आहे. सदर ट्रस्ट ही शाळेच्या उपयोगाची ट्रस्ट असून त्यात फक्त शाळेच्या उपयोगाकरिता या जागेचा उपयोग करण्यात यावा. मात्र एका व्यक्तीने मी या संस्थेच्या एकटाच मालक आहे. आणि दुसरे कोणीही नाही अशी भूमिका घेत तिथे खोदकाम केल्याचे दिसून येत आहे. या संस्थेच्या मॅनेजिंग डायरेक्टर या नात्याने पाहत आहे आणि उलट सुलट ग्राउंड ला खोदकाम केलेले आहे. या ग्राउंडवर कितीतरी वर्षापासून असलेली बोडी देखील बुजवून टाकलेली आहे. त्यात एक विहीर देखील बुजविण्याचा षडयंत्र करण्यात आलेली आहे.

सार्वजनिक मुत्रालय हे देखील तोडलेले आहे. ग्रामपंचायत ने लावलेले ओपन जिम हे देखील काहाढण्याचा षडयंत्र रचण्यात आले आहे. गट क्रमांक १२७ ही जागा एकट्याचे फायद्याची नसून लोकहिताकरिता वापरण्यायोग्य आहे. हा फक्त भूमाफियांचा मोबदला हडपण्याचा षडयंत्र आहे आणि चुकीच्या मेसेज सादर करीत आहे. सदरहू शाळा खाजगी असून तिला विकसित करण्याकरिता जागा विक्री करीत आहे. शाळा ही इंग्रजाच्या काळातली असून ही एक प्रकारे ऐतिहासिक वास्तु देखील आहे तिला देखील तोडण्याचा षडयंत्र चाललेला आहे. संपूर्ण गणेशपुर गावाला हा एकच विशाल ग्राउंड आहे. याशिवाय गावाला दुसरा कोणताही ग्राउंड नाही. कारण गावाच्या सभोवताली संपूर्ण गोसे धरणाचे पाणी झाले आहे. सदर जागेवर ग्रामपंचायतने देखील ना हरकत दिलेली नाही. तरी सदर प्रकरण हस्तक्षेप करून यावर कसल्याही बांधकाम किंवा अकृषक करण्यात येऊ नये म्हणून बंदी देण्यात यावी.

जेणेकरून लहान मुले वयोवृद्ध महिला आणि जेष्ठ नागरिक यांना फिरण्यास आणि खेळाडू याना खेळण्यास सोयीस्कर होईल. मिशन ग्राउंड वाचलाच पाहिजे अशा मागणीचे निवेदन गणेशपुर येथील ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांना निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी जनसेवक पवन मस्के , प्रवीण मेहर, गजानन मेहर, भावेश नागपुरे, ईश्वर मेहर, प्रकाश मेहर, गीतेश निपाने , यांच्यासह अनेक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.