चंगेरा येथील गो तस्करांचा भंडारा जिल्ह्याात धुमाकूळ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दोन ट्रकमध्ये जनावरांची निर्दयतेने वाहतुक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा व भंडारा पोलिसांनी शितला माता मंदिर भंडारा जवळ ते दोन्ही ट्रक पकडले. दोन्ही ट्रक व जनावरे मिळून ४३ लाख ६ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यातील चंगेरा येथील गो तस्करांचा धुमाकूळ सुरु असून अवैधपणे गोवंश जातीचे जनावरांची विक्री जोमात सुरु आहे. दि. १६ मे रोजी रात्रीच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिती कुळमेथे यांना जनावरांची वाहतुक होणार असल्याची माहिती मिळाली. माहितीचे आधारे त्यांनी आपले पथकासह शितला माता मंदिराजवळील शिव मंदिराजवळ त्यांना दोन ट्रक दिसले.

त्यांनी ट्रक थांबवून ट्रकची पाहणी केली असता त्यांना दाटीने व निर्दयतेने जनावरे कोंबून असल्याचे दिसले. आरोपी कासिम जुम्मन शेख (३३) व त्याचा सोबती सुरत शामलाल बागडे (२४) दोन्ही रा. वॉर्ड क्र. १ बालाघाट रोड, चंगेरा, ता. जि. गोंदिया तसेच ट्रक व जनावरांचा मालक इमरान रहमान शेख (३०) रा. चंगेरा, ट्रक क्र. एमएच ४० सि. एम. २७२६ चा चालक तौफिक तालीब खान (२३) रा. चंगेरा, त्याचा सोबती नंदलाल आसाराम सयाम (३०) रा. चंगेरा हे गोवंश जातीचे जनावरे अपुºया जागेत दाटी दाटी ने कोंबुन जनावरांना वेदना होईल अशा स्थितीत अवैध वाहतुक करतांना मिळुन आले.

ट्रक क्र. एमएच ४० सि. एम. २७२६ मध्ये २७ जनावरे तसेच ट्रक क्र. एमएच ३५ एजे १७२४ मध्ये ३१ जनावरे मिळून आले. त्यांच्या ताब्यातून दोन्हीट्रक व जनावरे असे मिळून एकूण ४३ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व जनावरे सुरक्षिततेकरीता भागीरथी गौशाला अनुसंधान बहुउदेषीय संस्था, मालीपार, चांदोरी येथे पाठविण्यात आले. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक लोहित मतानी व अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पडवार यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.