वाहनी येथे आढळले सारस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत असलेल्या वाहनी येथील बळीराम राऊत यांच्या शेतशिवारातील पाण्याच्या बोळीत १८ मे रोजी सारस पक्षी आढळून आले. याची माहिती मिळताच तुमसरचे उपविभागीय अधिकारी बी.वैष्णवी यांनी लगेच घटनास्थळ गाठून सारस पक्ष्यांची पाहणी केली व त्यांच्या संवर्धनाकरिता आवश्यक ते निर्देश दिले. सारस पक्षांचा जोडा काही दिवसापासून दिसेनासा झाल्याने हे पक्षी जिल्ह्यातून निघून गेल्याचे बोलले जावू लागले होते. मात्र १८ मे रोजी पुन्हा वाहनी शेतशिवारातील एका बोळीत सारस पक्षी आढळून आल्याने पक्षीप्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला. पक्षांची माहिती मिळताच स्वत: उपविभागीय अधिकाºयांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. राहांगडाले, सरपंच आसाराम ढबाले, पोलिस पाटील अतुल ढबाले, सोनेगाव बीट रक्षक ओ.एस. मोरे, शेतकरी बळीराम राऊत, अंकेक्षण राऊत व प्रशांत राऊत उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.