महाराष्ट्र शासनाचे शिवभोजन केंद्र बनले मालकाचे पोटभरू केंद्र

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : आघाडी सरकारच्या काळात गोरगरीब जनतेला, प्रवाशांना दोन वेळेचे जेवन मिळावे म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने कोरोना काळात विनामुल्य तर काही दिवसानी १० रुपयात शंभर ग्राम पोळी, वरण, भात, भाजी असे देण्याचे ठरवून मोठ्या गाज्यावाज्याने हि योजना सुरु केली होती. परंतु त्याच शिवभोजन केंद्रात बोगस लाभार्थी दाखवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु असल्याने चर्चेला उधाण आले आहे. शिवभोजन केंद्र चालकांच्या पोटभरु पणामुळे तुमसर तालुक्यात योजनेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. तुमसर तालुक्यात एकूण ११ शिवभोजन केंद्र आहेत.

त्यामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागात एक शिवभोजन केंद्र असून उर्वरीत तुमसर शहरात १० शिवभोजन केंद्र अगदी जवळजवळ आहेत. असे एकूण ११ शिवभोजन केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन झाले आहेत. याशिवभोजन केंद्रापैकी बºयाचश्या शिव भोजन केंद्रात राशनचे गहू, तांदूळ वापरून रस्त्यावर किंवा मुक जनावरांसमोर फेकून देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या भोजनात सडके टमाटर, काकडी, पान, गोभी, लवकी, भाजी, खान्यात देत येत आहे. शहरातील शिवभोजन केंद्र चालकाला ४० रुपये अनुदान मिळते, तर ग्राहकांकडून १० रुपये घेतल्या जातात. तर ग्रामीण भागात ३० रुपये अनुदान मिळत असून प्रत्येक शिवभोजन केंद्राला दरदिवशी शंभर लढवली आहे. शिवभोजन केंद्राच्या आजू बाजूचे दुकाने, रस्त्यावरून जाणारे लोकं, महिला कामगारांना धरून फोटो काढून बोगस बील शासनाच्या माथी मारत आहेत. यात विशेषबाब म्हणजे शहरी भागामध्ये तर लहान मुलांना असल्याचा आरोप लाभार्थी करीत आहेत.

उपाशी पोटी असलेला गोरगरीब ग्राहक चुपचाप भोजन खाण्याची वेळ लाभार्थ्यांचा कोटा पूर्ण करावा लागतो. त्यामुळे शासनाकडून तो मलीदा लाटण्यासाठी शिवभोजन चालकाने चांगलीच शक्कल शिवभोजन केंद्रावर बोलावून एक थाळी आणि वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज काढून त्यांना प्रत्येकी पाच रुपये देऊन १००थाळ्यांचा कोठा पूर्ण करण्याचे धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याकडे जिल्हा संबंधीत विभागाच्या पदाधिका-यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन अश्या शिवभोजन संचालकांवर तातडीने कारवाई करून दोषी आढळल्यास त्यांचे देयक थांबवून केंद्र तात्काळ रद्द करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. केंद्र चालकाची सिसिटिव्ही फुटेजच्या माध्यमातून सखोल चौकशी करून तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील शिवभोजन केंद्रावर पुरवठा अधिका-यांनी किंवा भरारी पथकाने जाऊन प्रत्यक्ष पाहणी व सखोल चौकशी केली पाहिजे. केंद्र चालकाकडून असे बोगस लाभार्थी दाखवत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी मागणी तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.