रेती चोरांना पाठबळ कुणाचे?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी: तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या चुलबंद नदीच्या लोहारा,नरव्हा व पळसगाव ह्या नदीघाटांवरुन रेतीची खुलेआम चोरी केली जात आहे.रेती भरलेले ट्रॅक्टर सर्रास दिवसाढवळ्या मुख्य मागार्ने पालांदूर येथील बाजार चौकातून खुलेआम धावतात.आपले वाहन पकडले गेल्यास सव्वा लाखांचा दंड ठोठावला जाईल याची कोणतीही भीती चोरट्यांमध्ये दिसून येत नाही. यावरून या रेती चोरट्यांना नक्की कोणत्या यंत्रणेचे पाठबळ आहे?महसूल,पोलीस अन्य कोणत्या विभागाचे याबाबत सर्वसामान्यांमध्ये विविध शंकाकुशंका उपस्थित होत आहेत.

शासनाने घरकुलांकरिता पळसगाव येथील नदीघाटातून झीरो रॉयल्टीची रेती लागू केलेली आहे.मात्र याचा रेती चोर गैरफायदा घेताना दिसून आले आहेत. ५ ब्रास रॉयल्टी ही घरकुल धारकांसाठीची असून या रॉयल्टीचा गैरफायदा घेऊन चोरलेली रेती ही पालांदूर व आसपासच्या ग्रामीण परिसरात जास्त दराने इतर नागरिकांना त्यांच्या खाजगी बांधकामासाठी विकली जात आहे.अशाप्रकारे अवैद्य रेती चोरी,वाहतूक व व्यवसाय करणा-यांबाबत महसूल प्रशासन अनभिज्ञ आहे. अवैद्य रेती वाहतूक करणा-या माफीयांना रात्री व सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक करायला मुभा मिळत आहे.एवढेचचे नाही तर एक ते दीड हजार रुपयाला मिळणारी एक ब्रास रेतीगरीब जनता असो किंवा सामान्य नागरिक यांना तीन ते चार हजार रुपये प्रति ब्रास असे मोजावे लागत आहेत.

पळसगाव-मुरमाडी,नरव्हा-लोहारापालांदूर या दोन मार्गांचा रेती तस्करीसाठी वापर केला जात आहे. रेती भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने जाताना दिसून येतात त्यामूळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून सामान्य नागरिकांमधून प्रश- ासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे.याबाबत तहसील कार्यालय लाखनी येथे संपर्क केला असता. तहसील कार्यालयामार्फत पथकांची नियुक्ती केली असून तपासणी चालू आहे. तपासणी मोहीम नेहमीसाठी चालू राहील.गौण खनिज उत्खनन करण्याकरिता परवानगी घेऊनच उत्खनन व वाहतूक करावी.असे संबंधितांकडून सांगण्यात आले.

पथक नेमले,मात्र कारवाया नावालाच

रेती, मुरूम व इतर गौण खनिजांच्या तस्करींवर आळा घालण्यासाठी तहसील कार्यालयाचे पथक नेमलेले आहे असे महसूल प्रशासनामार्फत नेहमीच सांगितले जाते.मात्र सदर पथक कसलीच ठोस अशी कारवाई करताना दिसून येत नाही.त्यामुळे रेती मुरूम व इतर गौण खनिज चोरी करणा-या तस्करांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिवसाढवळ्या खुलेअम रेती चोरली जात असल्याने प्रकार काही नवीन नाही.

“मी सुट्टीवर आहे.सुटीच्या दिवशी व रविवारी झिरो रॉयल्टीची रेती बंद असते.रेती तस्करीच्या प्रकाराबाबत मंडळ अधिका-याना कारवाई करण्याकरिता आदेश दिलेले आहेत.” श्री.मडावी नायब तहसीलदार तहसील कार्यालय,लाखनी

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.