खमारीच्या प्राची चटपची विविध क्षेत्रात उंच भरारी

मोहाडी : महिलांचे प्रेरणा स्थान असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मॉ.जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इत्यादींचा आदर्श प्राची चटपने डोळ्यासमोर ठेवले आहे. बाल वयापासूनच सामाजिक कार्याची व खेळाडू वृत्ती असल्याने शैक्षणिक अभ्यासाबरोबर महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाला महत्त्व दिले आहे. आणि पारंपरिक खेळ असलेला आट्यापाट्या हा खेळ निवडला. या खेळाचा योग्य सराव करून जिल्हा, विभाग व राज्यस्तर गाठला आहे. तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रिडा क्षेत्रात नाव लौकिक करण्यासाठी प्राचीने अनेकांना क्रिडाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने सदैव प्रयत्न करत आहे. भंडारा तालुक्यातील खमारी (बुटी) येथील भूमीहीन, निराधार दुर्गा केशव चटप यांची मुलगी प्राची आहे.

प्राची तीन वर्षाची असतांना वडील केशव चटप यांचे निधन झाले. घरात अठराशेवीस द्रारिद्रय असतांना कुटुंबाचे पालन- पोषण करण्याची जबाबदारी आईवर आली. मात्र आईवडिलांच्या स्वप्नाला तडा जाणार नाही. म्हणून प्राचीने शिक्षणाबरोबर समाजकार्य व क्रिडा क्षेत्रात गावाचे नाव लौकिक करण्याचा निर्धार केला. खमारी बुटी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत ती सध्या भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात बी. ए. तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. प्राचीला उंच भरारी मारण्याकरिता पंखात शक्ती प्रदान करण्याच्या ध्येयाने प्रेरित.. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांकरिता चालविलेलेग्रीष्मकालीन नि:शुल्क संस्कार होय. याच शिबिराच्या माध्यमातून मिळालेल्या विविध तज्ञ मार्गदर्शकांच्या प्रेरणेने नव्याने बळ मिळाले आहे. अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीत तीने गावाबरोबर जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. अशा ग्रामीण भागातून नेतृत्व करत जिल्हयासह राज्यस्तरीय आट्यापाट्या क्रिडा सत्रात भंडारा जिल्ह्यातील मुलींच्या संघाला द्वितीय स्थान प्राप्त करून दिले. प्राचीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्ह्याचे नाव लौकिक केले होते.

त्यामुळे राष्ट्रीय खेळाडू म्हणून कु. प्राची चटप ची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली होती. प्राची चटपने आट्यापाट्या खेळाचे उत्कृष्ट बाजी मारून सेमी फायनल मध्ये कर्नाटक, केरळ व मध्यप्रदेश येथील चमुचा पराभव करून फायनल मध्ये प्रवेश घेतला. त्यात केरळचा पराभव केला व पांडेचेरी विरुद्ध महाराष्ट्र या संघात महाराष्ट्र संघाचा व्दितीय क्रमांक तसेच फेडरेशन मध्ये महाराष्ट्र संघाने कर्नाटक व मध्यप्रदेश या संघाचा पराभव केला. तर महाराष्ट्र व पांडेचेरी या संघात पांडेचेरी संघाचा प्रथम तर महाराष्ट्र संघाने व्दितीय क्रमांकाचा पारितोषिक पटकाविला आहे. यात महाराष्ट्र संघाला सिल्वर पदकाने गौरविण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर प्राची ही नि:शुल्क स्थानिक नुतन कन्या विद्यालय व लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथील मुलींना आट्यापाट्या या खेळाचे प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे शालेय क्रिडा स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थीचा जिल्ह्यात व नागपूर येथे प्रथम व व्दितीय क्रमांक पटकावला आहे. अशा प्रकारे कामगिरी भंडारा जिल्हाच्या प्राचीचटपने महाराष्ट्राचे नाव चमकविल्याने जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.                                     राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा पांडेचेरी येथील स्पर्धेत महाराष्ट्र संघाला व्दितीय व फेडरेशन मध्ये व्दितीय स्थानी विजय मिळविल्याने महाराष्ट्र संघाने सिल्वर पदक जिंकले आहे. तसेच विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तिच्या कार्याची दखल घेऊन प्राची चा अनेक ठिकाणी गुणगौरव केला जात आहे. एवढेच नव्हे तर प्राची ही नि:शुल्क स्थानिक नुतन कन्या विद्यालय व लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथील मुलींना आट्यापाट्या या खेळाचे प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे शालेय क्रिडा स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थीचा जिल्ह्यात व नागपूर येथे प्रथम व व्दितीय क्रमांक पटकावला आहे. अशा प्रकारे कामगिरीभंडारा जिल्हाच्या प्राची चटपने महाराष्ट्राचे नाव चमकविल्याने जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. प्राची चटपने आपल्या यशाचे श्रेय आट्यापाट्या फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील, सचिव दिपक कवीश्वर, कोच व मार्गदर्शक श्याम देशमुख. संस्था सचिव डॉ. ललीत जीवानी, पुज्य सिंधी समाज अध्यक्ष जैकी रावलानी तसेच आई दुर्गा चटप हिला दिले असुन प्राची चटपचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, माहिती अधिकारी शैलजा वाघ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, समन्वयक डॉ. कार्तिक पन्निकर, शिक्षक डॉ. भिमराव पवार, रोमी बिष्ट, ई- मिडिया असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद भांडारकर, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक हितेंद्र वैद्य, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर, जिल्हा परिषद सदस्य रजनीश बन्सोड, समीर नवाज, खमारी येथील सरपंच खासदार सुनिल मेंढे, आमदार नाना पटोले, नलिनी काळे, माजी सरपंच क्रिष्णा शेंडे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजु कारेमोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, जिल्हा भंडारा क्रीडा व युवक मंडळांच्या सर्व पदाधिकारी, खेळाडू तसेच जिल्ह्यातील खेळाडू व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

सामाजिक कार्य

स्पर्धेच्या युगात वारत असतांनाच दिवसेंदिवस पर्यावरणाचा -हास होत आहे. म्हणून ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या निर्माण होत आहेत. म्हणून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रजातीच्या बि-बियाणे गोळा करून सीड बँक तयार करून पावसाळ्या पुर्वी सीडबॉल तयार करून रस्त्याच्या कडेला टाकत (फेकत) असते. व अन्य ठिकाणी वृक्षारोपण करत आहे. प्राची ही पर्यावरण प्रेमी असून अनेक संघटनेचे प्रतिनिधीत्व करत आहे. तसेच ऊन, वारा, हिमवर्षा किंवा कोणत्याही सण उत्सवाला कुंटुबासोबत न राहता देशाची सेवा करण्यासाठी डोळ्यात तेल घालून सदैव पाहरा देणा-या भारतीय सैनिकांना बहिणीची उणीव भासू नये म्हणून प्राची ह्यधागा शौर्य का राखी अभिमान कीह्ण या उपक्रमाअंतर्गत रक्षाबंधन ला राखी व संदेश रूपीपत्र गेल्या सात वर्षापासून कोब्रा बटालियनच्या सैनिकांना बांधत आहे. तसेच भंडारा येथील जिल्हा कारागृहात सुध्दा पोलीस बांधवांना राखी बांधत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू

लग्न किंवा विविध समारंभाच्या पत्रिका आपल्या व शेजारच्या घरी येत असतात. आणि कार्यक्रम संपल्यावर त्या निकाम्या होत असतात. अशा पत्रिका रद्दीवाल्याला विकतो किंवा इतरत्र फेकून देतो. मात्र अशा पत्रिकांपासुन आकर्षक शुभेच्छा पत्र किंवा लिफाफा बनवून महिला व बालकांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. त्यामुळे आर्थिक पाठबळ मिळाल्याने लर्निंग मळाल्याने आर्थिक, मानसिक व बौद्धिक विकास होण्यास मदत होत असते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.