‘बीएसडब्ल्यू’ च्या सहाव्या सेमिस्टर परीक्षेत गोंधळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आज नागपूर विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ‘बीएसडब्ल्यू’ सहाव्या सेमिस्टरच्या मराठी विषयाच्या पेपरमधील गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्तापाला समोर जावे लागल्याने त्याचा विपरीत परिणाम परिक्षेतील गुणांवर होण्याची शक्यता आहे. आज दिनांक २४ मे रोजी बीएसडब्ल्यू सहाव्या सेमिस्टरच्या मराठी विषयाची परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत आयोजित केली होती. भंडारा येथील प्रगती महाविद्यालय ह्या परीक्षा केंद्रावर मराठी विषयाची प्रश्न पत्रिका विद्यार्थ्यांना देताच, चुकीची प्रश्न पत्रिका हातात आल्याचे विद्यार्थ्यांना आढळले. भलत्याच अभ्यासक्रमाची प्रश्पत्रिका हातात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.

परंतु दुसºयांदा देण्यातआलेल्या प्रकरणातही विद्यापीठाने तब्बल २० ते २५ चुका केल्यात. सदर प्रकरण गंभीर असून चौकशीसाठी सत्यशोधन समिती नेमून दोषींवर कठोर कार्यवाही करावी. अशी मागणी नागपूर विद्यापीठाचे पूर्व सिनेट सदस्य प्रवीण येताच परीक्षा तडकाफडकी रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सदर प्रकरणाची माहिती नागपूर विद्यापीठाचे पूर्व सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांना दिली. परीक्षा केंद्रावर गेले असता सदर पेपर रद्द करण्यात आल्याचे महा- परीक्षार्थींना सांगितले. शेवटी विद्यार्थ्यांना ३ तास उशिराने नवी प्रश्पत्रिका देण्यात आली मात्र मिळालेल्या प्रश्नपत्रिकेतही अनेक चुका असल्याने चुकीच्या प्रश्नांना सरसकट पूर्ण मार्क देण्याची मागणी उदापूरे यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारे नागपूर विद्यापीठ स्वत: प्रश्न पत्रिकेत नापास झाल्याचा आरोपही प्रवीण उदापुरे यांनी केला आहे. चुकीचा पेपर दिल्याचे लक्षात विद्यालय प्रशासनाने घोषित केले. परंतु विद्यापीठांमध्ये याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येऊन बैठक सुरू असल्याचे व तांत्रिक गडबडीचे कारण देत त्यांनी लवकरच पेपर सुरू होईल असे महाविद्यालय प्रशासनाने उदापुरे व विद्यार्थ्यांनी केली आहे. घडलेल्या प्रकारा संदर्भात विषय तज्ञांची नागपूर विद्यापीठात तातडीची बैठक घेण्यात आली. नव्याने प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पावणे बारा वाजता देण्यात आली. अखेरविद्यार्थ्यांची परीक्षा १२ ते ३ या वेळेत सुरू झाली. तोवर प्रवीण उदापुरे यांचे सह अनेक विद्यार्थी महाविद्यालयात ठान मांडून बसले होते. नागपूर विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांना बीएसडब्ल्यू च्या सहाव्या सेमिस्टर च्या मराठी विषयाच्या चुकीच्या पेपर दिल्याने मनस्ताप सहन करावा लागला आहे. नाही तर प्रश्न पत्रिकेत एकूण २० ते २५ चुका करण्यात आल्या आहेत. Title च्या जागी Optional (ओपशनलाल) असे लिहिले आहे.

एवढेच नाही तर हिंदीचा ही वापर केला आहे. प्रश्नपत्रिकेत ºहस्व दीर्घ च्या ही अनेक चुका केल्या आहेत. अशी माहिती प्रवीण उदापुरे यांनी दिली. परंतु नव्याने देण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्नपत्रिकेत ही अनेक चुका करण्यात आल्यात. प्रश्र्न क्रमांक १ व ३ मध्ये अन्य वेगळ्या भाषेतील प्रश्न विचारले गेले आहेत. प्रश्न पत्रिकेतील भाषा सुद्धा विद्यार्थ्यांना समजलेली नाही. एवढेच विद्यापीठ आपल्या स्थापनेचे शंभर वर्ष पूर्ण केल्याने शतक महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. अशातच विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिकाच बदलने, हा प्रकार विद्यापीठाच्या प्रशासनिकव्यवस्थेवर गालबोट लावणारा आहे. सदर प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी नागपूर विद्यापीठाचे पूर्व सिनेट सदस्य प्रवीण उदापूरे यांनी केली आहे.

सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. विद्यापीठाची प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तज्ञ प्राध्यापकांची एक समिती असते. व तद्य प्राध्यापकांकडून प्रश्पत्रिकेचे अनेक सेट परीक्षेसाठी मागविण्यात येतात. संपूर्ण कार्य अत्यंत गोपनीय असते. त्यामधून एक सेट हा परीक्षेसाठी निवडण्यात येतो. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये इरह च्या सहाव्या सेमिस्टरच्या मराठीच्या प्रश्नपत्रिके च्या जागी अन्य विषयाचा पेपर दिल्यासंदर्भात एक विद्यापीठाने एक चौकशी समिती नेमावी अशी सुद्धा मागणी पूर्व सिनेट सदस्य प्रवीण उदापूरे यांनी केली आहे. विद्यार्थी हे उन्हातानामध्ये सकाळी आले होते. परंतु तीन तास त्यांचां पेपर उशिरा झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना तब्येत व स्वास्थ्याचे प्रश्न उद्भवले, यास दोषी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोपनीयतेचा भंग तर झाला नाही ?

दिलेली चुकीची प्रश्पत्रिका कोणत्या विषयाची? हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. सदर प्रश्न पत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात पडल्याने. व ती त्यांच्या जवळ तब्बल १५ मिनिटे होती. यामुळे गोपनीयतेचां भंग तर झाला नाही?. अन्य विषयाचा पेपर तर फुटला नाही अशी शंका उपस्थित झाली असल्याने, त्वरित सत्यशोधन समिती गठीत करण्याची मागणी पूर्व सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.