अकरा वर्षीय मुलीवर शेजाºयाचा अत्याचार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : शेजारी राहणाºया ४० वर्षीय विवाहित व्यक्तीने घरात शिरून अकरावर्षीय मुलीचे तोंड दाबून बलात्कार केला. ही घटना भरदुपारी बुटीबारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सचिन कुकडे असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली. पीडित ११ वर्षीय मुलगी नेहा (काल्पनिक नाव) ही सहाव्या वर्गात शिकते. तिचे आईवडिल शेतात मोलमजुरी करतात. त्यांच्या घराशेजारी आरोपी सचिन कुकडे हा राहतो. गुरुवारी दुपारी बारा वाजता सचिन नेहाच्या घरी आला. त्यावेळी नेहा झोपली होती. त्याने नेहाशी अश्लील चाळे केले. तिनेआरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचे तोंड दाबून सचिननेतिच्यावर बलात्कार केला.तिच्या आईवडिलांनी बुटीबोरी पोलीस ठाण्याततक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी तपास सुरु केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.