तलवारीने केक कापून साजरा केला रेती तस्कराचा वाढदिवस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : तलवारीने जाहीरपणे ११ केक कापून वाढदिवस साजरा करणाºया मोहाडी तालुक्यातील एका २७ वर्षीय युवकावर पोलिसानी गुन्हे नोंदविले आहेत. कमलेश बांडेबुचे असे त्या युवकाचे नाव असुन तो मोहाडी तालुक्यातील प्रसिध्द रेती तस्कर आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा या गावात हा प्रकार घडला. कमलेश बांडेबुचे या युवकाचा २७ मे रोजी वाढदिवस होता. यासाठी रोहा येथील परमात्मा एक ट्रडर्स या दुकानात त्याने सजविलेल्या टेबलवरएक दोन नव्हे तर, तब्बल अकरा केक तलवारीने कापले. विशेष म्हणजे, या सर्व केकवर ‘कमलेश शेठ’ असे लिहिले होते.

आपल्या मित्रमंडळांच्या उपस्थितीत आतशबाजी करीत त्याने रांगेत ठेवलेले केक तलवारीने कापून जल्लोष केला. एका मित्राने याघटनेचा मोबाईलवरून व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे कमलेश अडचणीत आला. हा व्हिडीओ पाहून पोलिसांनी या घटनेची दखल घेतली. पोलिसांच्या वतीनेच तक्रार दाखल करण्यात आली. त्याच्या दुकानात सोमवारी सकाळी झडती घेतली असता एक तलवार आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली आहे. त्याच्याविरूद्ध अनधिकृतपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.