ताडगावची वैभवी अमृत भोयर वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात तिसरी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या ताडगाव येथील खासगी वाहनचालक अमृत कवळू भोयर यांच्या मुलीने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत कठोर परिश्रमाच्या बळावर वाणिज्य शाखेत भरारी घेतली आहे. तिने ६०० पैकी ५५९ गुण ९३.१७ टक्के गुण मिळवित शाळेतून प्रथम तर भंडारा जिल्हातून तिसरी येण्याचा बहुमान मिळविला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या वतीने नागपूर विभागीय प्रमाणपत्र परीक्षा मार्च-२०२३ घेण्यात आली. त्या गुणवंत विद्यार्थीनीचे नाव कु.वैभवी अमृत भोयर असे आहे. ती भंडारा येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भंडारा येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

या शाळेतून एकूण वाणिज्य शाखेतून ६ मुली आणि २७ मुले असे एकूण ३३ परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु.वैभवी भोयर हिचे वडील अमृत भोयर यांचा शेती परंपरागत व्यवसाय आहे. तत्कालीन ग्रामीण विदर्भातील सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक भंडारा पत्रिकाचे संपादक रमेश महादेव चेटूले यांची चारचाकी खासगी वाहन चालक असून ते आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करत होते तर आई मंजू भोयर गृहिणी आहे. मुलीने शिकून मोठे व्हावे,अशी अपेक्षा आई- वडिलांची आहे. वैभवी रोज सकाळी व सायंकाळी तीन तास अभ्यास करायची. अभ्यासात सातत्य ठेवून शिक्षकांनी दिलेला विद्यार्थीहोमवर्क पूर्ण करून तिने हे यश संपादित केले. तिचे इयत्ता १ ते ४ प्राथमिक शिक्षण संस्कार बालक मंदिर भंडारा येथे मुख्यधापक सारंग नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. इयत्ता ५ ते १० पर्यंत लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे प्राचार्य केशर बोकडे, दीपिका गिरीपुंजे, भाग्यश्री दलाल, काळबांधे, काटेखाये, पाटेकर, नामदेव साठवणे(मोहाडी), भोंगाडे, गुरूनुले, बडवाईक यांच्या मार्गदर्शनाखाली समोर नृत्य आटापाट्या विभागीय क्रीडा स्पर्धेत पोहचली आहे.

इयत्ता दहावीमध्ये ८९ टक्के प्राप्त केले होते. भारतीय प्रजासत्ताक ६९ व्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या समूह स्पर्धेत शिक्षण अधिकारी रवींद्र काटोलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, शिक्षण सभापती नरेंद्र तुरकर यांच्या शुभहस्ते समूहनृत्य स्पर्धाचे प्रमाणपत्र स्वीकारले. तिला रासगरबामध्ये आवड असुन अश्विन नवरात्र उत्सवात रासगरबामध्ये अध्यक्ष सुनील घोगरे, उपाध्यक्ष समीर सूर्यवंशी, सचिव योगेश पडोळे, कोषाध्यक्ष सुरेश कनोजे यांच्या शुभहस्ते माधवनगर रेल्वे पटांगणावर सन्मानपत्र आणि ट्राफि वैभवी भोयर हिला देण्यात आली. आता सद्यस्थितीत वडील नागपूर ग्रामीण उपविभागीय अधिकारी मनोहर पोटे यांच्याकडे मागील बारा वर्षांपासून खासगी वाहन चालवत असून वेळ मिळताच मदतीचा हातभार लावातात.

 

वैभवीला बारावीनंतर बीकॉम, एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करून बँकिंग क्षेत्रातील समाजसेवेचे कार्य करायचे असल्याचे तिने दैनिक भंडारा पत्रिकाशी बोलताना सांगितले. शाळेचे प्राचार्य धनराज बारस्कर, शिक्षकवृद सरिता तवले, प्रशांत डोंगरे, गौरी पटेल, सुहास पुराणिक, रुपाली पेटकर, अक्षय मोहनकर व अन्य शिक्षकांनी वैभवीच्या घरी जाऊन आई-वडिलांच्या उपस्थितीत पेढा भरवून कौतुक केले. मोहाडी तालुक्यातील ताडगाव येथील मूळचे मोठे वडील देवानंद कवळू भोयर हे शेती सांभाळतात. आईचे माहेर तुमसर येथील रामकृष्णनगरातील भिवाजी आगाशे यांची मुलगी ५१ वर्षीय मंजू होय. मोठी बहीण १९ वर्षीय कु.मेघना अमृत भोयर हिने नुकतीच लॅब टेक्निशियनची परीक्षा दिली आहे. आजी ६९ वर्षीय शेवंता भिवा आगाशे हिने नातीन कु.वैभवी अमृत भोयर पेढा भरून पुढील वाटचालीस शुभेच्छा व आशीर्वाद दिले. जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून वाणिज्य शाखेतून प्रथम आणि जिल्ह्यातून तृतीय येण्याचा मान मोहाडी तालुक्यातील ताडगावची कु.वैभवी अमृत भोयर या विद्यार्थिनीने मिळविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश खोकले, सचिव संजय गुप्ते, संचालक रामदास शहारे, युगकांता रहांगडाले, नानासाहेब वझलवार, पी.बी. फुंडे, जोशी, प्रा.सुमंत देशपांडे, शुभांगी ऋषी, किसन शेंडे यांनी अभिनंदन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.