२६ जुलैपर्यंत कडेकोट लॉकडाऊन पाळण्याचे जिल्हाधिकाºयांचे निर्देश

प्रतिनिधी चंद्रपूर : शहरातील १७ ते २६ जुलै पर्यंतचा लॉकडाऊन पुढील काळातही अतिशय काटेकोरपणे पाळण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. चाचण्या वाढविण्यात आल्या असून चंद्रपूरमधील कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी दहा दिवस नागरिकांनी अतिशय संयमाने व सहकार्याने लॉकडाऊनला पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. चंद्रपूर जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या रविवारी २७६ वर पोहोचली आहे. कोरोना बाधितांच्या वाढीमधील रुग्ण दुप्पट होण्याचे अंतर वाढवायचे असेल तर त्यासाठी रुग्ण वाढीची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस कोणीही घराबाहेर पडू नये. लक्षणे असतील, आजारी वाटत असेल, तर त्यांनी उपचार घ्यावे. चाचणी करण्यासाठी पुढे यावे. त्यामुळे शहरातील मोठ्या लोकसंख्येत कोरोना प्रसार होणार नाही. यासाठीची ही उपाययोजना असून नागरिकांनी यामागील भूमिका समजून घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बाहेरून येणाºया नागरिकांमुळे अचानक रुग्ण संख्या वाढायला लागली होती. ही रुग्ण संख्या नियंत्रित आणणे साखळी तोडल्याशिवाय शक्य नाही.

संपर्काची साखळी तोडण्यासाठी घरात राहणे गरजेचे आहे. त्यामुळे २१ नंतर केवळ जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यासाठी लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत या काळात रस्त्यावरची गर्दी वाढणार नाही. याची सूचना पोलिसांना केली आहे. नागरिकांनी देखील याला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझि-ि टव्हमध्ये रविवारी १६ बाधिताची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या २७६ बाधितांपैकी १५९ बाधिताना कोरोनातून बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. तर ११७ जणांवर उपचार सुरू आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये ४८ बाधित हे परराज्यातील व परजिल्ह्यातील आहेत. या बाधितामध्ये ३ जण अ‍ॅन्टीजेन चाचणीतून बाधित म्हणून पुढे आले आहेत. आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये मुल येथील राईस मिल मध्ये काम करणाºया दोन कामगारांचा समावेश आहे. अनुक्रमे ५० व २५ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *