तुमसर येथे खा.सुनिल मेंढे यांच्याद्वारे दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप शिबिर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : ग्राम विकासातून लोककल्याण संकल्पनेवर आधारित विविध योजना आणि उपक्रम राबवित ग्रामोन्नती साधण्याचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. दिव्यांगानाही स्वबळावर उभे राहता यावे यासाठी साहित्य वाटपाची योजना तेवढीच महत्त्वाकांक्षी असल्याचे मत खा.सुनील मेंढे यांनी व्यक्त केले. तुमसर येथे केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि एआयडीपी उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्त साधुन विविध समस्या घेऊन त्या सोडविल्या जातील या आशेने आलेल्यातालुक्यातील असंख्य नागरिकांचे आज खा. सुनिल मेंढे यांनी समाधान केले.

तुमसर तालुक्यातील नागरिकांसाठी आयोजित जनता दरबारात अनेक समस्या मांडल्या गेल्या. जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित राहून महसूल, जिल्हा परिषद, कृषी, वीज वितरण कंपनी, घरकुल, पाणी समस्या अशा विविध विषयांवर आपल्या अडचणी मांडल्या. यातील काही तक्रारी आणि समस्या संबंधित अधिकाºयांशी बोलून निकाली काढल्या तर काहींच्या दृष्टीने ठराविक कालावधीत त्याचा निपटारा करण्यासाठी सूचना खा.मेंढे यांनी दिल्या. सहज सुटणा?्या मात्र सरकारी यंत्रणेच्या कारभाराला बळी पडलेल्या अनेक तक्रारी या जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या होत्या.

याप्रसंगी मा.डॉ.परिणय फुके,प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप पडोळे, जि.प. सदस्य बंडू बनकर, जि.प.सदस्य दिलीप सार्वे, मुन्ना फुंडे, भाजप शहर अध्यक्ष पंकज बालपांडे, तालुका अध्यक्ष भाजप काशीराम टेंभरे, प.स.सभापती नंदू रहांगडाले, प.स.सदस्य लक्ष्मीकांत सेलोकर,राजाभाऊ लांजेवार, सरपंच राजेंद्र पिकलमुंडे, शशिकला चौधरी, राजकुमार मरठे, संतोष वहिले, कुंदाताई वैद्य, शोभाताई लांजेवार, गीताताई कोंडेवार, तहसीलदार तुमसर तेडे, खंड विकास अधिकारी नंदागवळी, प.स.सदस्य सुशिला पटले, प.स.सदस्य आम्रपाली पटले, विराचंद पुरामकर, चौधरी उपाध्यक्ष अपंग सेल, महेंद्र शेंडे, सुरेश ठवकर, राजेश पटले आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.