आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश,९ कोटींचा ऐवज जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : बंगळुरू येथून दिल्लीला पाठवलेला ६ कोटी रुपयांचा इलेक्ट्रॉनिक्स ऐवज नागपुरातून चोरून नेणाºया आंतरराज्यीय टोळीस गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून कंटेनरसह ९ कोटींचा ऐवज जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय पाटील व गुन्हे शाखेचे उपायुक्त मुम्मका सुदर्शन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हरिश हाजर खान (रा. सिंघा कुन्हाना हरियाणा), साहिज सफी मो. खान (रा. धरमपेठ जि. वाल्सद गुजरात), मोहम्मद मुस्तफा धन्ना खान (रा. कोट) व आसिफ मुसुद खान (रा. तपवन, दोन्हीहरियाणा) ही आरोपींची नावे आहेत. फिर्यादी अमरनाथ गोविंद संगह्याम (रा. राममूर्तीनगर, बंगळुरू यांनी 26 जूनला कंटेनरने (केए-५३एए-४२३३) गारमेन्ट्स व ६८५ लॅपटॉप, असा एकूण ७ कोटी ४३ लाख ३१ हजार ३८ रुपयांचा ऐवज दिह्यीला पाठवला. जीपीएस यंत्रणेद्वारे २९ मे रोजी २ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत लोकेशन पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिसत होते. फिर्यादीनागपूला आले. सिल तुटलेला रिकामा कंटेनर आढळला. चालक व वाहक बेपत्ता होते.

मोबाईल बंद होते. ६ कोटी ८ लाख ९६ हजार ७७ रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तकह्यार १ जूनला अमरनाथ यांनी पारडी पोलिस ठाण्यात केली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, गुन्हे शाखा उपायुक्त मुम्मका सुदर्शन, सहआयुक्त अश्वती दोर्जे, अतिरिक्त आयुक्त संजय पाटील यांनी खास पथक तयार करून तपासकामी मार्गदर्शन केले. तपासात आरोपी गुजरातमधील बारडोलीत असल्याचे निष्पन्न झाले. योगायोगाने यूनिट एकचे पथक कळमनामधील ट्रक चोरीच्या तपासात तेथेच होते. त्यांना आरोपींची माहिती दिल्यावर बारडोली पोलिसांच्या मदतीने चारही आरोपींना शोधून अटक केली. 9 कोटींचा ऐवज जप्त केला. वाहन चोरी पथकाचे उपनिरीक्षक अनिल इंगोले, अंमलदार दीपक रिठे, विलास कोकाटे, संतोष गुप्ता, पंकज हेडाऊ, कपील तांडेकर, राहुल कुसरामे, सायबर यूनिटचे उपनिरीक्षक बलराम झाडोकार, अंमलदार चंद्रशेखर राघोर्ते, अनंत क्षीरसागर, पुरुषोत्तम नाईक, मिथून नाईक, पराग ढोक, यूनिट एकचे उपनिरीक्षक दीपक ठाकरे, बबन राऊत, सुशांत सोळंकी, सोनू भवरे, रितेश तुमडाम यांनी ही कामगिरी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.