साहेब, जि. प. शाळेत शिक्षक कई द्याल जी…!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शाळेत विद्यार्थी संख्या कमी आहे. आम्ही कॉन्व्हेंट मधून विद्यार्थी काढले. जिल्हा परिषद शाळेत मुलं घातली. पण, शाळेत शिक्षकांची संख्या कमी आहे. गुणवत्ते काय असा सवाल करून ‘साहेब, त्या शाळेत शिक्षक कई द्याल जी… ‘ अशी आर्त विनंती अन् संताप पवनी तालुक्यातील आसगाव व कºहांडला येथील पालकांनी जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी यांच्याकडे व्यक्त केला.

दहावीचा वर्गात जिल्ह्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती रमेश पारधी, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लिकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) रवींद्र सोनटक्के व मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, राज्य मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी, भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव राजू बांते, उपाध्यक्ष प्रमोद धार्मिक, विष्णूदास जगनाडे, राधेश्याम धोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक नसल्याची व्यथामांडली. संतापून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. सुमारे एक ते दीड तास पालकांनी आपली समस्या मांडल्या. आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेशी एकनिष्ठ आहोत. आपली शाळा समजून झटत असतो.

पण, शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी शिक्षक नाहीत. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता मागे पडली आहे. मग आम्ही आमची मुले जिल्हा परिषद मध्ये का पाठवायची? असा सुध्दा सवाल पालकांनी शिक्षण सभापती रमेश पारधी यांना केला. यावर, शासन विद्यार्थी संख्येच्या आधारावर असतानाही जिल्हा परिषद घड्याळी तासिकेवर शिक्षक पुरवत आहे. शासन मात्र, शिक्षक भरती करण्याचा नाव घेत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचा अतोनात नुकसान असल्याची खंत सभापतींनी बोलून दाखवली. शाळांमध्ये शिक्षक नाही हा प्रश्न फक्त जिल्हा परिषद शाळांचा नाहीतर खाजगी अनुदानीत शाळांचा मोठा प्रश्न असल्याचे मुख्याध्यापक संघाचे सचिव राजू बांते, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी, प्रमोद धार्मिक यांनी शिक्षक देत असते. शिक्षक संख्या कमी सांगितले.

तत्पूर्वी, दहावीच्या परीक्षेतजिल्ह्यातून प्रथम आलेली विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पवनी येथील गार्गी विलास वैरागडे व द्वितीय आलेली तिची बहीण गोमती विलास वैरागडे तसेच जिल्हा परिषद शाळांमधून प्रथम आलेली आसगाव जिल्हा परिषद हायस्कूलची विद्यार्थिनी प्रथम आलेली उत्कर्षा मुरलीधर कुलुरकर यांचा शिक्षक सभापती रमेश पारधी, शिक्षणाधिकारी संजय डोर्लिकर, रवींद्र सोनटक्के, गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा, राज्य मुख्याध्यापक संघाचे अशोक पारधी, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव राजू बांते, प्रमोद धार्मिक, राजू भोयर, राधेश्याम धोटे, विष्णूदास जगनाडे यांनी स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र तसेच पुष्पगुच्छ देवून कौतुक केले. यावेळी गार्गी व गोमती यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात जावून करियर करणार असल्याचे सांगितले. तसेच उत्कर्षा कुलुरकर हिने प्रशाकीय सेवेत जाणार असल्याचे सांगितले. यावेळी विकास एज्युकेशन सोसायटी पवनीचे सचिव ए.एम. माथुरकर, उपाध्यक्ष पी.एस. काटेखाये, मुख्याध्यापक एस.एस. गभने, विस्तार अधिकारी नरेश टिचकुले, गट समन्वयक दिपाली बोरीकर यांची उपस्थिती होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.