आज ६ रुग्ण कोरोनाबाधित

प्रतिनिधी वर्धा : जिल्ह्यात आज ६ कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. यातील ४ रुग्ण पूर्वी पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाच्या निकट संपकार्तील आहेत. बाधित रुग्णात हिंगणघाट १, कारंजा १ आणि वर्धा ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०० झाली असून एकूण अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ४६ आहेत. शिवाय आज आर्वी मधील दोन रुग्णांना आणि वधेर्तील ३ रुग्णांना उपचारानंतर कोरोना आजारातून बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५० झाली आहे. जिल्ह्यात आज आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये हिंगणघाट शहरातील २५ वर्षीय युवक आणि कारंजा तालुक्यातील काकडा या गावातील एक ४५ वर्षीय पुरुष तसेच वर्धा केशव सिटी १ महिला व बोरगाव मेघे येथील दोन पुरुष एक महिला कोरोना बाधित आहेत.

आजच्या कोरोना बाधित रुग्णासहित जिल्ह्यात एकूण रुगणांची संख्या १०० वर पोहचली असून ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तसेच अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६ झाली आहे. प्रयोगशालेय तपासण्या जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ४ कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ६ हजार ९०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ६ हजार ७७६ निगेटिव्ह तर १०० पॉझिटिव्ह आहेत, तसेच ९९अहवाल प्रलंबित आहेत. आज १२९ स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवि ण्यात आले असून आयसोलेशन मध्ये १६० व्यक्ती आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *