बनावट करारनामा, नव्वद लाखांची फसवणूक

नागपूर : कोतवाली पोलिस ठाणे हद्दीत चक्क ९0 लाखांच्या फसवणुकीची घटना पुढे आली आहे. ६ आॅगस्ट २0१५ ते १८ आॅगस्ट २0१५ दरम्यान फियार्दी आनंद विश्वनाथ श्रीवास्तव (वय ५९ वर्ष, रा. प्लॉट नंबर ८0, ८१, गजानन प्रसाद सोसायटी, व्हेटनरी कॉलेज मागे, सेमिनरी हिल्स) यांच्या मालकीची मौजा गोरेवाडा येथे जमीन आहे. दरम्यान, आरोपी साबीर मियाज खान (वय ४४ वर्ष, रा. गिट्टीखदान) हितेश रघुवीर अग्रवाल (वय ३८ वर्ष, रा. ४0३, ंबैरागीपुरा, चितेश्वर मंदिर), एजाज अकबर अंसारी (वय ३५ वर्ष, रा. ३/१ गोविंदनगर, तपोवन) एक अनोळखी इसम वय ४0 ते ५0 वर्ष यांनी ही जमीन हडपण्याच्या उद्देशाने आरोपी साबीर मियाज खान याने उपरोक्त जमिनीचा बनावटी खरेदी करारनामा केला.ही जमीन ९0 लाखांची आहे. अर्थात, आरोपीने फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *