अवैध रेती वाहतुकीचे ५ टिप्पर जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा स्थागुशा पथकाने पवनी तालुक्यातील बेटाळा येथे अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाºया पाच टिप्पर वर कारवाई करीत १ कोटी २ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पवनी तालुक्यातील बेटाळा रेती घाटातुन अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतुक केली जात असल्याची माहिती स्थागुशा विभागाला मिळाली.त्या आधारे भंडारा स्थागुशा विभागाने आज ६ जून रोजी बेटाळा येथे अवैधरित्या रेतीची वाहतु करणाºया पाच टिप्परवर कारवाई केली. त्यामध्ये पाच टिप्पर व ९० ब्रास रेती असा एकुण मिळुन १ कोटी २ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी टिप्पर चालक राहुल रामेश्वर खैरवार वय २६ वर्ष रा. दिघोरी , सोनू हजरत खान वय २२ वर्ष रा. दिघोरी , ओम तुकारामजी भोगे वय २७ वर्ष रा. चांपा , विनोद लक्ष्मण कोकोडे वय ३० वर्ष रा. बोरडा व प्रवीण रंगराम इरपाते वय ३० वर्ष रा. चांपा यांचे विरोधात पवनी पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.