राज्यात दिवसभरात ९ हजार ४३१ नवे करोनाबाधित, २६७ जणांचा मृत्यू

प्रतिनिधी मुंबई : देशभरासह राज्यात अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल ९ हजार ४३१ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर, २६७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. याचबरोबर राज्यातील करोना बाधितांची एकूण संख्या आता ३ लाख ७५ हजार ७९९ वर पोहचली आहे. राज्यभरातील एकूण ३ लाख ७५ हजार ७९९ करोनाबाधितांच्या संख्येत, सध्या उपचार सुरू असलेल्या १ लाख ४८ हजार ६०१ जणांचा व आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या २ लाख १३ हजार २३८ जणांचा समावेश आहे.

राज्यात करोनातून बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ५६.७४ टक्क्यांवर आले आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील मृत्यू दर ३.६३ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या तब्बल १८ लाख ८६ हजार २९६ नमून्यांपैकी ३ लाख ७५ हजार ७९९ (१९.९२ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीस ९ लाख ८ हजार ४२० नागरिक गृह विलगीकरणात आहेत. तर, ४४ हजार २७६ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *