गॅस सिलेंडरच्या स्फोटात भाजलेल्या महिलेचा अखेर रूग्णालयात मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : घरगुती गॅसचा स्फोट होवून एक महिला गंभीररित्या भाजल्याची भयंकर घटना दि. २९ एप्रिल २०२३ रोजी स. १० वाजता साकोली तालुक्यातील लवारी येथे उघडकीस आली होती. अपघात इतका भीषण होता की यात घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले होते. सदर महिलेवर गत सव्वा महिण्यापासून नागपूर येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने तिची दि. ५ जून २०२३ रोजी रात्री १ वाजता अखेर मृत्यूशी झुंज संपली. कोमल गौरीशंकर पांडे (४५) असे या दुदैर्वी महिलेचे नाव असून तिच्या पाथीर्वावर दि. ६ जून रोजी दुपारी ४ वाजतादरम्यान लवारी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोक- ाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लवारी येथील गौरीशंकर पांडे यांची पत्नी कोमल पांडे या घराजवळील अंगणवाडीत शिकणाºया विद्यार्थ्यांचा स्वयंपाक घरीच तयार करायच्या. नित्याप्रमाणे त्यांनी घटनेच्या दिवशी स्वयंपाक तयार करून स. ९ वाजतादरम्यान अंगणवाडीत पोहचवला व त्यानंतर त्या घरी परत आल्या. दार उघडून स्वयंपाकघरात येताच अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की त्यात कोमल पांडे ९५ टक्के भाजल्या होत्या. शेजारी राहणाºया लोकांच्या मदतीनेताबडतोब त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना त्वरीत नागपूर येथे शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर गेल्या सव्वा महिण्यापासून उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत काहीच सुधारणा नव्हती. अखेर तिचा मृत्यू झाला.

या स्फोटात घरातील सर्व सामान देखील जळून खाक झाले होते. कपडे, धान्य, सोफा, टीव्ही, फ्रीज, स्वयंपाक खोलीतील संपूर्ण सामान जळून खाक झाले होते. कोमल पांडे यांच्या कुटुंबात पती गौरीशंकर पांडे तसेच मुलगा कुणाल व मुलगी शेजल असा परिवार आहे. गौरीशंकर पांडे पूजा अर्चा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या घटनेत पत्नी कोमलचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. या घटनेत झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरीत शासनाने द्यावी अशी कुटुंबियांची मागणी आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.