लवकरच होणार… जुन्या रेल्वे पुलाचे पुनर्निर्माण कार्य सुरू

प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया शहर रेल्वे रूळामुळे दोन भागात विभागले गेले आहे. शहरातील दळणवळनाला महत्त्वाची दुवा असलेला जुना रेल्वे पूल शहराच्या दोन्ही भागांना जोडण्याचे कार्य शतकापासून करत आहे. मात्र या पुलाने आपली वयोमर्यादा ओलांडली असून मागील काही वर्षांपासून या पुलावरून अवजड वाहतूक प्रतिबंधित केले आहे. फक्त लहान व हलक्या वाहनांना या पुलावरून ये-जा करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र या पुलामुळे शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा जोडला गेला असल्याने बाजारपेठेत येणारा साहित्य हा लवकरात लवकर पोहोचवा यासाठी या पुलाची नितांत आवश्यकता असते. तसेच नागरिकांनाहि या पुलावरून प्रवास करणे जास्त सोयीचे होते. नागरिकांची अशी विविध समस्या जाणून आमदार विनोद अग्रवाल यांनी या पुलाचे पुनर्निमाण व्हावे यासाठी पाठपुरावा केला. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेऊन चर्चा केली.

शिवाय विविध विभागांना तसेच रेल्वे विभागालाही पत्राद्वारे सदर पुलाचे पुनर्निमाण करण्याची मागणीही आमदार विनोद अग्रवाल यांच्या माध्यमाने करण्यात आली. यावर डिसेंबर २०१९ ला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमाने प्रस्ताव तयार करून तो रेल्वे विभागाला पाठवण्यात आला. यावेळी दोन विविध मागण्याची प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्यापैकी एक म्हणजे जुन्या पुलाला नष्ट करण्याचे कार्य तर दुसरं नव्याने पुलाची निर्मिती करणे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय बैठक बोलावण्यास आली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता उपस्थित होते. त्यांना सर्व तांत्रिक अडचणी दूर करून प्रस्ताव तयार करणे, रेल्वे विभागाला पाठवण्याची सूचना करण्यात आल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करून रेल्वे विभागाला सादर केले असता त्यात विविध त्रुटी आढळून आल्या.

मात्र त्यातून त्यांची पूर्तता करत वारंवार आबा विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा करत रेल्वे विभागाला पुलाचे प्रस्ताव त्रुट्या विरहित तयार करण्यात आले असून रेल्वे विभागानेही त्यावर शिक्का मोर्तब केला आहे. लवकरच काही दिवसात या पुलाचे नष्ट करण्याचे कामासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवले जाणार आहे. या पुलाला नष्ट करण्यासाठी ६.५० कोटी रुपयांचा खर्च येणार असून एकूण पुल निर्मिती पर्यंत ८२ कोटीचा खर्च लागणार आहे. यासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि इतर मान्यतासाठी आमदार विनोद अग्रवाल सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या पुलाच्या निर्मितीमुळे शहरातील अंतर्गत वाहतूक सुकर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *