टिप्परच्या धडकेत इसमाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : सेलोटपार येथील इसम मुंडिकोटा येथून किराणा सामान घेऊन आपले गावी जात असता नागपूर येथून गिट्टी भरून जाणारे टिपरचे धडकेत गंभीर जखमी होऊन मरण पावला. सेलोटपार येथील भीमराव बाळकृष्ण शेंडे ४५ वर्ष हे आज दिनांक ८ जून रोजी सकाळी १०.३०वाजता आपले मोटार सायकल क्रमांक एमएच ३६-५१८९ ने मुडिकोटा येथून किराणा सामान घेऊन सेलोटपार कडे जात असता मुडिकोटा बस स्थानकासमोरील तिरोडा तुमसर मार्गावर नागपूर वरून गीट्टी भरून तिरोडा कडे जात असलेले टिपर क्रमांक एमएच ४० ८००१ ने धडक दिल्याने मोटरसायकल स्वार जबर जखमी झाल्याची माहिती तिरोडा पोलिसांना मिळताच हवालदार शिवलाल धावडे व पोलीस शिपाई महेंद्र अंबादे यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन गंभीर जखमीस उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचारा करता आणले असता उपचारादरम्यान मरन पावल्याने टिपट चालक कमलेश सहादेव मेश्राम ३२ वर्ष राहणार कारधा याच्या विरोधात भादवी कलम ३०४ अ ,२७९ नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास हवालदार शिवलाल धावडे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.