गोंदिया शहराचा भूमापनाचा (सिटी सर्वे) चा मार्ग मोकळा

प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया शहराचा भूमापनाचा (सिटी सर्वे) रेंगाळलेला विषय आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने अखेर मार्गी लागला असून २०१९ ला गोंदियाच्या जनतेच्या आमदारकीची सूत्रे स्विका- रल्यानंतर आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाना यश आले आहे. यासाठी आमदार अग्रवाल यांनी गोंदिया ते मुंबई व्हाया पुणे असा विविध स्तरांवर पाठपुरावा केला. गोंदिया शहराचे भूमापन व्हावे अशी मागणी सतत होत होती तसेच भूमाफियाच्या हैदोसामुळे नागरिक देखील त्रस्त झाले होते. आमदार विनोद अग्रवाल यांनी केलेल्या सतत पाठपुराव्यामुळे अखेर भूमापनाचा विषय निकाली निघाला. तसे पत्रकच दि. २७ जुलै २०२० ला महसूल विभागाने काढले आहे. यानुसार गोंदिया शहरातील जमिनीचा भूमापन केले जाणार असून गोंदिया नगरपरिषद क्षेत्रातील गावांचे भूमापन करण्याचे आदेश दिले आहे.

या भूमापनात गोंदिया (बु.), गोंदिया खुर्द, कटंगी कला (अंशत:), कुडवा (अंशत:), मूर्री (अंशत:), पिडकेंपार (अंशत:), गोंदिया नझुल आणि डायव्हर्जन इत्यादी परिसराचा समावेश केला आहे. या भूमापनाची जबाबदारी मुख्याधिकारी नगर परिषद गोंदिया आणि जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या निदर्शनात अधीक्षक आणि उपअधीक्षक भूमिअभिलेख गोंदिया यांच्या माध्यमातून होणार असून सदर भूमापन पूर्ण करण्यासाठी ४० महिन्यांचा कालावधी आखून देण्यात आला आहे. सध्या गोंदियात ९ हजार नोंदणीकृत प्रॉपर्टी असून भूमापनानंतर तब्बल ३० हजार पेक्षा अधिक मालमत्ता नोंदणी होणार आहे. याने पालिकेला चांगल्या प्रमाणात महसूल प्राप्त होणार असून नागरिकांना देखील ७/१२ चा उतारा देणे सोपे होणार आहे.

सोबतच प्रत्येक मालमत्ता धारकाचे स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड सुद्धा तयार केले जाणार आहे. शहरात अनेक मोठे भूखंड असतात त्यांचे छोट्या प्लॉट मध्ये रूपांतर करून जमीन विक्री करण्यात येते मात्र त्यातून रस्ते व इतर वापरासाठी सोडलेल्या भूखंडाचा ७/१२ काढून त्याचा गैरवापर करून अनेक भूमाफिया नागरिकांना त्रास देत असतात. मात्र यातून आता नागरिकांना सु- टका मिळणार असल्याने मालमत्ता धारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *