मोहगावदेवीची हिमानी लेंडे मोहाडी तालुक्यातून प्रथम

तालुका प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या वतीने मार्च-२०२० मध्ये नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली. वरठी येथून सेवानिवृत्त ट्रॅकमॅन मोहगावदेवी येथील रहिवासी पतीराम आडकू लेंडे व प्रभावती पतीराम लेंडे यांची नातीन मोहाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील देना बँकेच्या उजव्या बाजूला असलेल्या पूर्वा बर्तन भांडार संस्थापक व संचालक पुरुषोत्तमजी लेंडे व मोहाडी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या मोहंगावदेवी महिला बचत गटाचे आर्थिक साक्षरता सखी सौ.पूनमताई पुरुषोत्तमजी लेंडे यांची जेष्ठ कन्या कु.हिमानी पुरुषोत्तम लेंडे हिने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ५०० पैकी ४८६ गुण ९७.२० टक्के प्राप्त करून मोहाडी तालुक्यातील प्रथम आली आहे. नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय भंडा- राच्या वतीने जागतिक वाघ दिन बुधवार दि.२९ जुलै २०२० ला दुपारी २ वाजता वृक्षभेट देऊन विद्यार्थीनी कु.हिमानी पुरुषोत्तम लेंडे, आई सौ.पूनम पुरुषोत्तम लेंडे, वडील पुरुषोत्तम लेंडे यांचा संस्थापक एम.एल.भुरे, मुख्याधापिका सीमा चित्रीव, वर्गशिक्षक मोहरील, गुर्जर, ढोटे, जोशी, रहांगडाले, सार्व यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ग्रामीण विदर्भातील सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक भंडारा पत्रिकाच्या वतीने यशवंत थोटे व मित्र परिवाराकडून हार्दिक अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *