आज आणखी नवे तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

प्रतिनिधी गोेंदिया : सातत्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. आज तब्बल नवे तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे निदान गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळा अहवालातून झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या ४२ वर पोहचली आहे.तर २६७ अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या ४२ झाली असून एकूण बाधित रुग्ण २७९ आहेत. आजपर्यंत कोरोनामुक्त झालेले रुग्ण २२८ आहेत. आज तब्बल तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये देवरी येथे दोन आणि गोंदिया तालुक्यातील कटंगीकला,चांदणीटोला,गोंदिया शहरातील श्रीनगर व मरारटोली असे एकूण चार रुग्ण असून मरारटोली येथे आढळून आलेला रुग्ण हा जालंधर येथून आलेला आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील डवा येथील एक रुग्ण, तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा व बेलाटी येथील एक रुग्ण, सालेकसा तालुक्यातील सीतेपार येथील कश्मीर येथून आलेला रुग्ण,आमगाव तालुक्यातील तिगाव व घाटटेमनी येथील प्रत्येकी एक यापैकी घाटटेमनीचा रुग्ण हा राजस्थान येथून आलेला आहे तर एक रुग्ण हा मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर येथून जिल्ह्यात आलेला आहे.गोंदियाच्या विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण ९०६५ नमुने पाठविण्यात आले.त्यापैकी ८४१६ नमुने निगेटिव्ह तर २६७ नमुने पॉझि-ि टव्ह आढळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *