खºया लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल द्या!

तालुका प्रतिनिधी मोहाडी : येत्या २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घरकुल योजनेचा लाभ देण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. परंतु मोहाडी तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतीच्या घरकुलच्या ‘ड’ यादीचा ग्रामपंचायत आॅपरेटर व सचिवांनी सर्वे करते वेळी दुजाभाव करून खरे लाभार्थ्यांना डावलून त्यांचे आॅनलाईन केले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ‘ड’ यादीनुसार खरे लाभार्थ्यांचे नाव सुटल्याने घरकुलच्या ‘ड’ यादीत मोठा घोळ झाला आहे. तरी तात्काळ दुरुस्ती करून ग्रामपंचायच्या ठरावानुसार ‘ड’ यादीतील नाव सुटलेला लाभार्थीचे आॅनलाईन करून गरजूवंत लाभार्थींना ‘ब’ यादीत समावेश करण्याची मागणी ग्रा.पं.सदस्य नितीन लिल्हारे यांनी केली आहे.

मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द, पिंपळगाव, उसर्रा, आंधळगाव, बडेगाव, डोंगरगाव, काण्हळगाव, टांगा, ताडगाव, धोप, जांब, हिवरा, हरदोली, काटी, कांद्री आदी गावात नाव सुटलेल्या लाभार्थी बरोबर सरपंच यांना तारेवरची कस- रत करावी लागत आहे. सालई खुर्द येथील रामदास लिल्हारे, दिलीप मांढरे, कुशवलाल लिल्हारे, भगवान नागपुरे, शिवलाल मांढरे, प्रभू लिल्हारे, फिरतलाल सव्वालाखे, गणेश अटराहे, मनोज आंबाडारे, रवींद्र चचिरे, भाली उरकुडे, सूरज तिरोडे, संकपाल ठाकरे, विठोबा मेश्राम, राजू अटराहे आदी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ न मिळाल्याने अजूनही कच्च्या घरातच वास्तव्यास आहेत. ज्यांचे बीपीएल यादीत नाव असेल, अशा लाभार्थ्यांना पूर्वी घरकु लाचा लाभ मिळत असे. त्यामुळे पात्र असूनही अनेक लोकांना घरकु लाच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. परंतु आता ज्यांचे कौलारू घर असेल, मातीचे, कुडाचे किंवा कच्च्या विटांचे असेल, अशा लाभार्थ्यांना सरसकट घरकुलाचा लाभ देण्याचे प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजना तयार केली आहे.

परंतु, मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथील शेकडो लाभार्थी अल्पभूधारक शेतकºयाचे घर मातीचे व कौलारू आहे. पावसाळ्यात जागोजागी गळत असल्याने घरावर झाकण्यासाठी पाल घ्यावे लागत असल्याने आर्थिक झळ सोसावी लागते. अनेकांना पक्के घर असूनही घरकु लाचा लाभ मिळाला आहे. परंतु, पात्र असूनही नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांना आपल्या मोडक्या, कच्च्या घरातच दिवस कंठावे लागत आहेत. खोट्यांना लाभ, खरे वंचितसरकारने दारिद्रयरेषेखालील नागरिकांना अनेक सवलती व विविध योजनांचे लाभ दिले आहेत. पण, काहीजणांनी आर्थिकदृष्ट्या सधन असतानाही दारिद्रय रेषेखालील अर्थात बीपीएल यादीत आपले नाव चढविले आहे. असे नागरिक घरकुल व इतर अनेक योजनांचा लाभ घेत आहेत. अशा खोट्यांना लाभ मिळत असताना खरे गरीब नागरिक लाभापासून वंचित आहेत. जिल्हाभरात अशी अनेक प्रकरणे असून, याची व्यापक चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य नितीन छोटेलाल लिल्हारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *