नराधम मामाकडून चार वर्षीय भाचीवर अत्याचाराचा प्रयत्न

प्रतिनिधी हिंगणा : एमआयडीसी पोलिस ठाणेअंतर्गत वैशाली नगर परिसरात नातेवाइकानेच चार वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. त्यानंतर आज,रविवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. अभिजित शेषराव मानेकर (वय २५) रा. एकात्मता नगर, हिंगणा रोड नागपूर असे आरोपीचे नाव आहे. तर पीडित बालिका ही एकात्मता नगराला लागून असलेल्यादुसºया नगरात आईसोबत राहते.तिला वडील नाही.आरोपी हा दूरचा मामा लागतो. त्यामुळे पीडितेच्या घरी त्याचे जाणे-येणे होते. १० जून रोजी पीडितेची आई मजुरीचा गेली होती. दुपारी चार वाजता आरोपी बालिकेला घेऊन घराशेजारी असलेल्या नाल्याजवळ घेऊन गेला. तिथे पीडितेसोबत अश्लील चाळे करत असताना काही तरुणांना दिसला. ते मुलीच्या मदतीला येताना पाहून आरोपी पळून गेला.

त्यानंतर लोकांना वाटले की, हा पुन्हामुलीच्या घराकडे येणार नाही. पण रविवारी ( ता.११)पुन्हा सकाळी आरोपी मुलीच्या घराकडे येताना दिसला. परिसरातील तरुणांनी त्याला पकडले. पोलिस व मुलीच्या आईला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार भीमा नरके यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शारदा भोपाळे करीत आहेत. वैशालीनगर व एकात्मता नगरमधून जाणाºया या नाल्याशेजारी नेहमी दारुडे व प्रेमी युगुल, तरुणांचा वावर असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.