स्वयंसहाय्यता समुहाच्या महिला होणार आत्मनिर्भर

प्रतिनिधी भंडारा : उमेद महा- राष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, भंडारा तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष भंडारा अंतर्गत अस्मिता प्लस योजनेअंतर्गत भंडारा तालुक्यातील ५५ स्वयंसहाय्यता समूहातील, बचतगटातील महिलांना अस्मिता प्लस सॅनिटरी नॅपकिन गाव स्तरावर विक्रीचा व्यवसाय सुरू करून व्यावसायीक होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे खºया अर्थाने ग्रामीण भागातील महिलांना अर्थाजन होऊन महिला सक्षमीकरणाचे कार्य उमेद अभियानाच्या माध्यमातून होणार आहे़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या संकल्पनेनुसार प्रेरणा घेऊन एका गावात एक समूह यानुसार स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांना सॅनिटरी नॅपकिन विक्रीचा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना बाजार भावापेक्षा कमी किमतीत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होतील. त्यामुळे जास्तीत जास्त महिला इतर कोणतेही घरगुती उपाय न करता हे सॅनिटरी नॅपकिन वापरून आपले आरोग्य सुरक्षीत ठेऊ शकतात. आज तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष भंडा- रा येथे उमेद अभियान आर्थिक समावेशन जिल्हा व्यवस्थापक पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक उमेद कार्यालय भंडा- राच्या सुखदेवे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील ५५ समूहांना उपस्थित प्लस सॅनिटरी नॅपकिनचे बॉक्स वितरीत करण्यात आले. यावेळी ता़ अ़ कक्ष भंडाराचे सर्व तालुका व्यवस्थापक आणि प्रभाग समन्वयक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *