वेगवेगळया प्रकारच्या राख्यांनी सजली बाजारपेठ

गोवर्धन निनावे भंडारा : कोरोनाच्या लढयात सोशल डिस्टसिंगचा योग्य वापर करून सध्या बाजारपेठेत राख्यांची विक्री सुरू आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाला घट्ट करणारा राखीचा सण आता दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठ राख्यांच्या दुकानांनी सजली असून त्यात विविध प्रकारच्या राख्या दिसून येत आहेत. एकीकडे कोरोनाची भिती असली तरी आपल्या भावाला राखी बांधायची आहे या भाऊ-बहिणीच्या प्रेमापोटी बहिणींची राखी खरेदीसाठी आता शहरातील बाजारपेठेत सज्ज झालेल्या राखीच्या दुकानांत गर्दी दिसून येत आहे. सुरक्षेचे वचन देणाºया भावाच्या हाताला राखी बांधून बहीण आपली माया प्रकट करते. रेशमाचा साधा दोरा यासाठी पूरेसा असला तरिही काळानुसार राखीच्या प्रकारांत बदल होत गेला आहे. पैशांकडे न बघता बहिणी आपल्या भावासाठी चांगल्यात चांगली राखी खरेदी करतात. यामुळेच भंडारा शहरातील बाजारपेठ वेगवेगळया राख्यांनी सजलेल्या दिसून येत आहेत.

सोमवार दि. ०३ आॅगस्ट रोजी असलेल्या राखी सणानिमित्त सध्या बाजारात बच्चे कंपनीसाठी खास कार्टूनच्या राख्या आल्या असून यामुळे चिमुकल्यांना पब्जी, छोटा भीम, मोटू-पतलू व डोरेमोन या कार्टू नचे फॅड लागले आहे. त्यामुळे त्यांना शैक्षणिक साहीत्यांपासून ते कापडांपर्यंत सर्वच वस्तूंवर हे कार्टू न्स हवे आहेत. आता राखीच्या बाबतीतही हाच प्रकार दिसून येत आहे. चिमुकल्यांची ही पसंती लक्षात घेता बाजारात पब्जी, छोटा भीम, मोटू-पतलू, डोरेमोन, बाल हनुमान, एंग्री बर्डच्या राख्यांची धूम दिसून येत आहे.राखी म्हणजे रेशमाची साधी डोरही तेवढीच महत्व ठेवते. मात्र आता भावाला राखी बांधणेही फॅशनेबल झाले आहे. बहिणींची ही पसंती बघता आता राख्यांमध्येही आर्टीफिशीयल डायमंड वर्क दिसून येत आहे. हातात बांधण्यात येत असलेल्या ब्रेसलेट सारख्या राख्या आता बाजारात उपलब्ध होत आहेत.

रंगबिरंगी डायमंड लावलेल्या राख्या अधिक आकर्षक दिसत असल्याने त्यांची जास्त डिमांड दिसून येत आहे. शिवाय या राख्या आकर्षक पॅकींगमध्ये येत आहेत. त्यामुळे या राख्यांना बघताच समोरची व्यक्ती आकर्षीत होते. सद्यस्थितीत शहरातील बाजारपेठ निरनिराळया राख्यांनी सजल्या असून राखींच्या दुकान बहिणींची गर्दी वाढली आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने अनेकांना घेरले असून या पार्श्वभूमिवर कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासनाने काही नियम व अटी दिल्या आहेत. या नियम व अटींचे पालन करून तसेच सोशल डिस्टसिंगचा योग्य वापर करून सध्या बाजारपेठेत दुकानदारांनी राख्यांची विक्री सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *