आज पुन्हा १४ कोरोना बाधितांची भर

प्रतिनिधी गोंदिया : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वेगाने वाढतांना दिसत आहे. आज पुन्हा नव्या १४ रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांचे अर्धशतक होऊन ही संख्या ५५ वर पोहचली आहे. तर गोंदिया तालुक्यातील भानपूर येथील उपचारातून बरा होऊन घरी परतला आहे. जिल्ह्यात एकूण बाधित रुग्ण २९३ झाले आहे. २२९ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. आज जे १४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यात तिरोडा तालुक्यातील ओमान येथून आलेल्या आठ व्यक्तींचा समावेश आहे.

अजुर्नी/मोरगाव तालुक्यात तीन रुग्ण आढळून आले,यामध्ये दोन रुग्ण ओरिसा येथून तर एक रुग्ण हैद्राबाद येथून आलेला आहे. गोंदियाजवळील कुडवा येथील दोन रुग्ण आहे. एक रुग्ण हा सालेकसा येथील असून तो रायगड येथून आलेला आहे. या बाधित रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता २९३ झाली आहे.तर ५५ रुग्ण हे क्रियाशील आहेत. गोंदियाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण ९२४९ नमुने पाठविण्यात आले.त्यापैकी ८७६१ नमुने निगेटिव्ह तर २८१ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे. ८८ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. ११९ नमुन्यांच्या अहवाल अनिश्चित आहे. आतापर्यंत जिल्ह्याच्या बाहेर चार कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. त्यात नागपूर येथे तीन आणि एक रुग्ण बंगलोर येथे बाधित आढळून आला आहे.बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातून आढळलेले चार, प्रयोगशाळेतून २८१ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून आठ असे एकूण २९३ बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळले आहे. संस्थात्मक विलगिकरण कक्षात २२४ आणि गृह विलगिकरणात ९८५ असे एकूण १२०९ व्यक्ती विलगिकरणात आहे.

हे सर्व जण आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहे. जिल्ह्यात जे बाधित असण्याची शक्यता आहे अशा रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. यामध्ये आजपर्यंत जिल्ह्यातील १९३८ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये १९३० अहवाल निगेटिव्ह तर ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने १८८ चमू आणि ७२ सुपरवायझरची ४२ कॅटेंटमेंट झोनसाठी नियुक्ती केली आहे. कंटेंटमेंट झोनमधील मधुमेह, उच्च रक्तदाब,आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या घशातील स्त्राव घेण्यात येत आहे.

जिल्ह्यात ४२ क्रियाशील कॅटेंटमेंट झोन आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यात मुंडीपार, फत्तेपुर, डोंगरगाव, सेजगाव, पारडीबांध, गोंदिया येथील कुंभारेनगर व सिव्हिल लाईन.रेल्वे लाईन, कुडवा. सालेकसा तालुक्यातील पाथरी,पाउलदौना,शारदा नगर, रामाटोला व तितेपार,देवरी तालुकयातील देवरी येथील वार्ड क्रमांक ५,८,९,१० आणि १६,आखरीटोला,गरवारटोली,सडक/अजुर्नी तालुक्यातील राका, सौंदड, खोडशिवनी व पाटेकुरा. गोरेगाव तालुक्यातील भडंगा,डवा व घोटी आणि तिरोडा तालुक्यातील तिरोडा येथील सुभाष वार्ड, विर वामनराव चौक,भूतनाथ वार्ड, न्यू सुभाष वार्ड,किल्ला वार्ड, नेहरू वार्ड, गराडा,बेरडीपार, बेलाटी/खुर्द, अजुर्नी/मोरगाव तालुक्यातील भिव-ि खडकी आणि आमगाव तालुक्यातील तिगाव आदी गाव आणि वार्डचा या कंटेनमेंट झोनमध्ये समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *