जिल्ह्यात आज दोन नवे रुग्ण

प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात आज दोन व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये तालुक्यातील दोन व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत १९७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या २५० झाली असून ४७ क्रियाशील रुग्ण तर ४ संदर्भित रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या ०२ आहे. आज ३१ जुलै रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये ८८ व्यक्ती भरती असून ७०७ व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३७२ व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात १३ व्यक्ती पॉझिटिव्ह तर १३५९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *