आ.परिणय फुके सह माजी तालुका अध्यक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी लाखांदुर: गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम अजून किती वर्षे चालणार? असा प्रश्न मोहरणा परिसरातील शेतकरी विचारत आहेत. गत पाच वर्षांपासून डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने परिसरातील शेतकºयांना बाराही महिने सिंचनाची सोय होऊ शकली नाही. लाखांदुर तालुक्यातील नांदेड शेत शिवारात डाव्या कालव्यावर पाणिवाटपाचे गेट करण्यात आले आहे. काही राजकीय मंडळी संबंधित यंत्रणेला फोन करून पाणी बंद करायला लावुन आ परिणय फुके सह माजी तालुका अध्याक्ष नुतन कांबळे यांना स्वताची राजकीय पोळी सेकण्यासाठी बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब समोर आली. याची ता २८ ला नुतन कांबळे आणि आ परीनय फुके यांनी दखल घेत डाव्या कालव्याचे नांदेड गेट वरुन बंद केलेले पाणी पुर्ववत सुरु करण्याचे आदेश दिल्याने ” दुध का दुध और पाणी का पाणी” अशी सत्यता संबंधीत शेतक-यांना पाहायला मिळाली.

मोहरना जी प क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या गावामध्ये इंदिरा सागर प्रकल्प गोसे च्या डाव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. सदर पाणी साधारण १० दिवसा अगोदर सोडण्यात आले होते. या गावांमध्ये सुरू असलेला डावा कालवा अपूर्ण अवस्थेत आहे. तरीही शेतकºयांचे हीत लक्षात घेऊन संबंधित अधिकारी-यांनी पाण्याचा विसर्ग सुरू केला. यावेळी मौजा टेंभरी व खैरी/पट येथील काही शेतकºयांची शेती पाण्याखाली आली, स्वताचे बुडीत क्षेत्र वाचविण्यासाठी याच भागातील काही राजकीय मंडळीनी स्वयंघोषित भूमिपुत्राला फोन करुन पाण्याचा विसर्ग बंद करायला लावला आणि अधिका-यांनी शुध्दा शेतक-याचे नुकशान आणि फायदा याचा विचार न करता अचानक पणे नादेंड गेटवरुन पाण्याचा विसर्ग बंद केले . अचानक पाण्याचा विसर्ग बंद केल्या या भागातील काही शेतक-यांची रोवनी खोळंबली तर काहीचे रोवलेले धान सुकु लागले. ज्या शेतक-यांनी पाणी बंद करायला लावले त्यांच शेतक-यांनी भाजप नेते आ परिणय फुके आणि माजी भाजपा लाखांदुर तालुका अध्यक्ष नुतन कांबळे यांनीच पाणी बंद करायला लावले अशी खोटी अफवा पसरवुन यांच्याविषयी शेतक-यांच्या मणात कटुता निर्माण करण्याचे काम सुरु केले .

सदर अफवेची माहिती होताच नूतनजी कांबळे यांनी ही अफवा कोणी पसरवि ली याची सहानिशा करण्यासाठी नांदेड येथील मुख्य कालव्याला भेट दिली सदर बाबीचा खुलासा संबंधित अधीकारी यांच्या कडून करून घेतला,तर त्याठिकाणी अनेक नवे समोर आली.याची माहिती लगेच आ परिणय फुके यांना दिली असता त्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना फोनवर विचारणा करून सदर अफवा व पाणी बंद करायला कोणी सांगितले याचा खुलासा करायला सांगितले. आणि लगेच तात्काळ पाण्याचा विसर्ग करण्याचे आदेश दिले. यावेळी नूतनजी कांबळे यांच्या सोबत भाजप नेते प्रवीण राऊत, दिलीप डिब्बे, विलास मांडवकर, किरमटी येथील मंगेश कावळे, संतोष राऊत,चक्रधर तुपटे,देवेंद्र प्रधान, प्रμफुल नाकाडे, साठवणे ,वैद्य, गुरुदेव रामटेके,दिलीप कांबळे व असंख्य शेतकरी हजर होते .

खबरदार खोट्या अफवा पसरवुन शेतकºयांना वेठीस धराल तर- आ. परिणय फुके

संपुर्ण जिल्हात शेतक-यांना सर्वतोपरीने मदत करण्याचे काम चालु आहे. शेतकरी शेतमजुर माझा राजकीय कना आहे. त्याना जर त्रास होत असेल तर याचे दुख मला आहे.स्वताला मि भुमिपुत्रम्हणुन मत मागित नाही आणि मागितले सुध्दा नाही पण माझा शेतकरी शेतमजुर कोणत्याही संकटात सापडत असेल तर एका हाकेवर मदत करण्याची तयारी आपली आहे . या वर्षात आपण शासन दरबारी धान खरेदीची मूदत वाढवुन देण्याची मागणी लावुन धरली आणि शासनाने ती पुर्ण केल्याने शेतक-यांचे धान मोजल्या गेले.

आता पावसाने दळी मारल्याने शेतकरी हवालदील झाला असल्याने आपण शेतक-यासाठी पाणी सोडण्यास लावले काही ठीकानी शेतक-याच्या शेतात पाणी पोचविण्यासाठी स्वता जेसीबीचा खर्च करुन नाल्यावाटे पाणी पोचविण्याचे काम केले. माज्या शेतक- यांसाठी मी काही करीत असल्याचे तुम्हाला पाहाने शक्य होत नसेल तर पाहणे बंद करा परंतु राजकीय मंडळीनी आणि अधिका-यांनी माज्या शेतक-यांना स्वताच्या स्वाथार्साठी वेटीस धरु नका ? खबरदार खोट्या अफवा पसरवुन शेतक-यांना वेटीस धराल तर अशा तिवृ शब्दात आ परिणय फुके यांनी ईशारा दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *