अन रासायनिक खत पाण्यावर तरंगू लागते तेव्हा ….

रवी धोतरे लाखनी : सध्या शेतीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतात पीक घेण्यासाठी रासायनिक खत वापरणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. रासायनिक खतशिवाय उत्पादन घेणे सध्या परिस्थितीत कठीण आहे. त्यामुळे शेतकºयांनी पावूस सरसरीपेक्षा कमी असताना सुधा ऐन केण प्रकारे आपल्या शेतातील पिकांची रोवणी व्हावी यासाठी मिळेल त्याच्याकडे पाण्याची भीक मागित शेतकरी रोवणीच्या कामाला लागला असून झालेल्या रोवणीला खत मारण्यासाठी मिळेल त्या कृषि केंद्रांकडून रासायनिक खताची खरेदी करून आपल्या शेतात धांनाचे पीक जोमत आणण्याचा प्रयत्न करीत असताना कृषि साहित्य पुरवठा करणाºया कंपण्यांकडून शेतकºयांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रकार लाखनीत शुक्रवा- री (ता. ३१) ला उघडकीस आला. असून याला जगातील ८ वे आश्चर्यच मानले जाईल. कारण कधीही रसायनिक खत पाण्यावर तरंगूच शकत नसल्याची माहिती वयोवृद्ध तसेच आधुनिक काळातील उच्चविद्या विभूषित गलेलठ्ठ शासनाचे वेतन घेणारे अधिकारी यांचे म्हणणे आहे.

यासबंधी अधिक माहिती घेतली असता येथील शेतकरी नरेंद्र देशमुख यांनी बावनकुळे कृषि केंद्र, नगरपंचायत जवळ लाखनी तसेच लाखनी तालुका खरेदी झ्रविक्री सहकारी संस्था यांच्याकडून आरसीएफ कंपनी द्वारा निर्मित सुफला २०:२०:०:१३ या रसायनिक खताची खरेदी केली. ते खत शुक्रवारी (ता. ३१) ला आपल्या शेतात झालेल्या रोवणीला टाकण्यात आले. मात्र ते खत शेतात टाकून झाल्यावर आश्चयार्चा त्यांना धक्काच बसला …….. चक्क टाकलेले खत पाण्यावर तरंगू लागल्याने हे चीन निर्मित तर खत नाही न ?

अशी शंका येताच त्यांनी ताबडतोब लाखनी पंचायत समिति चे कृषि अधिकारी माणिक जांभूळकर यांना भ्रमणध्वनि द्वारे माहिती देवून तरंगणाºया रासायनिक खताची कहाणी सांगितली असता कर्तव्य दक्ष अधिकारी यांनी बांधावर भेट देवून झालेला प्रकार लक्षात घेतला सदर रासायनिक खताची तालुक्यात कुणीही कृषि केंद्र चालकांनी विक्री करू नये असे आदेश पारित केले. व झालेल्या प्रकाराची माहिती आरसीएफ कंपनी, जिल्हा कृषि अधिकारी व वरिष्ठांना भ्रमणध्वनि द्वारे दिली असून आज दि. ०१/०८ /२०२० ला सर्व उच्च स्तरीय अधिकारी त्या तरंगनाºया रासायनिक खताची पाहणी करणार असून यात निर्मिती द्वारे तांत्रिक दोष की चीनी बनावटीचे रासायनिक खत याची सत्यता जाणून घेणार असल्याची माहिती प. स. कृ. अ. यांनी दिली असून हे तरंगणारे रासायनिक खत मात्र जगातील ८ वे आश्चर्य ठरणार असल्याची खात्रीशिर माहिती आहे.

याकडे पटोले साहेब लक्ष घालतील काय ?

शेतकरी व भूमिपुत्र च्या नावावर महाराष्ट्रात सर्व परिचित असणारे साकोली विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व विद्यमान विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी तरंगनाºया आरसीएफ सुफला २०:२०:०:१३ या रासायनिक खतासबंधी योग्य ती चौकशी अधिकाºयांना करण्यास लावून हे ८ वे आश्चर्य नाही याबाबतचा निर्णय घेण्याची मा. अध्यक्ष महोदयांवर आली आहे हे विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *