बयवाडा येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील मौजा बयवाडा येथे दिनांक १७ जून २०२३ ला सौ मेघाताई बिसेन राष्ट्रीय ओबीसी महासंघ महिला प्रदेश सहसचिव यांचे अध्यक्षते खाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वाय. टी. कटरे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ होते. या बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणा बाबद व ओबीसी विद्यार्थी वसतिगृह व इतर बाबींवर चर्चा झाली ओबीसींचा लढा हा आत्मसन्मानाचा लढा आहे सुप्रिम कोर्टाने मागास वर्गियांचा आंतरिम अहवाल नाकारला, त्यामुळे देशातील ओबीसी लोकांचे आरक्षण धोक्यात आले. यावर आता या देशातील जाती निहाय जनगणना हा एकच पर्यायासाठी येत्या ८ आँगस्टला तिरुपती येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे अधिवेशन आयोजिले आहे.

तरी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येउन या अधिवेशनात सहभागी होऊन ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा द्यायला समोर यावे यावेळी प्रमुख उपस्थिती भुमेस्वर पारधी जिल्हा उपाध्यक्ष, चैतराम मलेवार माजी उपसरपंच, किशोर मलेवार सामाजिक कार्यकर्ता, सौ कल्पना मलेवार पोलीस पाटील, सुनील बावानकर, सेवक मरघडे तंटामुक्ती अध्यक्ष, सौ श्यामकला मलेवार ग्राम पंचायत सदस्य, व्यंकट मरघडे माजी उपसरपंच व गणमान्य ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी वानु मलेवार, अमोल मलेवार, गणेश र,हरिराम चकोले, चरणदास बावनकर, गणेश मलेवार,सौ कल्पना मलेवार बचत गट अध्यक्ष, सौ उमाबाई मलेवार अंगणवाडी सेविका, सौ ललिता येरने, शेषराव मरघडे, उदाराम मरघडे, सौ गीताबाई बावनकर, श्री प्रमोद बावनकर, गोविंदा मलेवार, गजानन मलेवार गरीबचद मलेवार , हरिदास मलेवार यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन किशोर मलेवार यांनी केले तर मान्यवरांचे आभार हे मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले. शेंदरे, चिंतामण शेंदरे, वामन मलेवा- व्यंकट मरघडे यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.