श्रावणबाळ प्रकरणाचा मास्टर माईंड दुसराच

मोहाडी : श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळण्यासाठी ज्या ३५ लोकांनी खोटे दाखले जोडून अर्ज सादर केले होते त्या अर्जदा- रांची चौकशी सुरू झालेली असून अर्जदारांनी दिलेल्या बयाना नुसार सर्वांचे अर्ज तेथीलच एका व्यक्तीने भरून दाखल केल्याचे समोर आले आहे. तसेच दाखल केलेल्या अजार्तील खोटे दस्तऐवज सुद्धा त्याच व्यक्तीने स्वत: तयार केल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे. ताडगाव येथील ३५ व्यक्तींनी श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले होते. परंतु त्या सर्व अजार्सोबत जोडलेले तलाठी अहवाल, वैद्यकीय प्रमाणपत्र व आधार कार्ड बनावटी होते. व हे प्रकरण खूप गाजले होते, आता तहसीलदारांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून नायब तहसीलदार हुकरे हे चौकशी करीत आहेत.

अर्जदा- रांनी दिलेल्या बयाना नुसार ताडगाव येथील श्रावण सीताराम डोये हा त्या अर्जदाराकडे येऊन तुम्हाला श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून देतो असे म्हणून त्यांच्याकडून फोटो, आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स तसेच अर्जा करिता लागणारा खर्च कुणाकडून हजार तर कुणा कडून दोन हजार रुपये अर्ज भरण्या साठी त्याने घेतल्याचे ह्या अर्जदारांचे म्हणणे आहे. ह्या अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जावर स्वत: स्वाक्षरी किंवा अंगठा सुद्धा लावलेला नाही. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र व तलाठी अहवाल सुद्धा अर्जदारांनी आणलेला नाही, असे त्या अर्जदारांचे म्हणणे असल्यामुळे हे सर्व बनावटी कागदपत्रे श्रावण डोये यांनीच तयार केले असावे असा संशय आहे. यात दोषी कोण हे चौकशी पूर्ण झाल्यावरच कळणार आहे. या प्रकारचे अनेक बोगस प्रकरणे असून काही लोक याचा लाभ घेत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्या प्रकरणाची सुद्धा चौकशी करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणातील सर्व अर्जदार निर्दोष असून, त्यांच्या अज्ञानाचा लाभ उचलून खोटे कागजपत्र तयार करणाºया व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी.’

-रिता सुरेश हलमारे संचालक,जिल्हा दुग्ध उत्पादक संघ,भंडारा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *