नागपूरमध्ये दोन पोलीस कर्मचाºयांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : शहर पोलीस दलात सेवा देत असलेल्या दोन पोलीस कर्मचाºयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धंतोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ५० वर्षीय पोलीस शिपाई आणि पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले ५४ वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना न्यूमोनिया झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तर पोलीस शिपाई यांना बुधवारी (दि. ५ आॅगस्ट) संध्याकाळी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताच त्यांचादेखील मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *