कोरोनाचा फैलाव सुरूच

गोंदिया : संपुर्ण जगभर कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले असतांना जिल्ह्यात देखील कोरोना संसगार्चा फैलाव झपाट्याने वाढत आहे. आज ६ आॅगस्ट रोजी प्राप्त अहवालात नवे २२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर चार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. आजच्या २२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ४८६ झाली आहे.तर क्रियाशील रुग्णांची संख्या २०६ वर पोहचली आहे. जे २२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळून आले आहे.त्यामध्ये सर्वाधिक ११ रुग्ण हे गोंदिया शहरात आढळून आले आहे. यामध्ये एक रुग्ण फुलचुर, सिंधी कॉलनी येथील आठ रुग्ण, सरदार पटेल कॉलनी येथील एक आणि सिव्हील लाइन येथील एक रुग्ण.आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध येथील दोन रुग्ण, गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार आणि पाथरी येथील प्रत्येकी एक रुग्ण, सडक/अजुर्नी येथील एक रुग्ण.

तिरोडा तालुक्यात सहा रुग्ण असून यामध्ये मुंडिकोटा येथील दोन रुग्ण,घोघरा येथील एक, अदानी प्रकल्पातील एक रुग्ण आणि एक रुग्ण तिरोडा येथील रवींद्र वार्डचा आणि एक रुग्ण हा छोटी/बेलाटी येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या २०६ वर पोहचली आहे. कोरोना या आजारावर मात करून आज चार रुग्ण घरी परतले आहे. यामध्ये देवरी येथील एक, तिरोडा तालुक्यातील किंडगीपार येथील एक, सडक/अर्जुनी तालुक्यातील डवा येथील एक आणि एक रुग्ण गोंदिया येथील आहे. जिल्ह्यातील एकूण २५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण १०४२० नमुने पाठविण्यात आले. यामध्ये ९७८४ नमुने निगेटिव्ह आढळून आले. ४४८ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे. १४५ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे.तर १४३ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. चार कोरोना बाधित रुग्ण जे जिल्ह्याचे रहिवासी आहेत ते जिल्ह्याबाहेर बाधित आढळले आहे.गोंदियाच्या प्रयोगशाळेतून ४४८ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून ३४ असे एकूण ४८६ कोरोना पॉझिटिव्हरुग्ण आढळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *