जिल्ह्यात विविध ठिकाणी नेटवर्कचा तुटवडा

प्रतिनिधी भंडारा : आजच्या आधुनिक जीवनशैलीत प्रत्येक जण मोबाइलमुळे इंटरनेटच्या जाळ्यात गुंतलेले आहेत. आपले सर्वाधिक काम मोबाइलच्या साहाय्याने करतात. कित्येक विद्यार्थी हे आनलाइन शिक्षण सुद्धा घेत आहेत. पंरतु नेटवर्क गती बरोबर मिळत नसल्याने कॉल करुन संवाद साधने कटिन झालेले असुन अनेकांना चटका बसत आहे. ग्राहकांचे वेळोवेळी केलेले रिचार्ज वापर न होताच त्या विशिष्ठ सिम कंपनीचा नफा होत असुन ग्राहकांच्या खिशाला चटका बसत आहे. विविध ठिकाणाहून कित्येक लोक सिम स्टोरमध्ये जावून तक्रार करत आहेत. पंरतु त्या तक्रारीचे निराकरण होतांना दिसत नाही. याक-ि रता भंडारा जिल्ह्यातील स्थानिक तथा जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रीत करून समस्याचे निराकरण करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *