प्रश्न विचारणाºयांना विनयभंगाची धमकी देणाºया ‘त्या’ महिला सरपंचावर अपात्रतेची कार्यवाही करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिल्ली : सरकारी जागेवर अतिक्रमण करून ग्रामस्थांशी अरेरावी तसेच विरुद्ध पार्टीच्या नागरिकांची कामे रोखून मतदान करणाºया लोकांची दुटप्पी भूमिका घेणाºया सिल्ली येथील महिला सरपंचांना पायउतार करण्यासाठी ग्रामस्थांनी दिनांक ६.६.२०२३ तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झाली नसल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी पुन्हा दि.१७ जून रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील सरपंच सुचिता चंद्रशेखर पडोळे गावकºयांबरोबर अरेरावीच्या भाषेत बोलत असून गावाकºयांची विकास कामे करण्याऐवजी विरुध्द पक्षाच्या नागरिकांच्या अर्जावर सही करताना तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाला मतदान केल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडेच जाऊन सही मागाण्याचा सल्ला देऊन नागरिकांची अडवनुक करतात.

सरपंच हे घटनात्मक पद असून गाव विकासाचे नागरीकत्व आहे. मात्र सरपंचांना केवळ त्यांना मतदान करणाºया नागरिकांची कामे करायची असल्यामुळे काही ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांमध्ये असंतोष आहे. याशिवाय ग्रामसभेत कोणी मला जास्त प्रश्न विचारेल तर मी त्याच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार देईल अशी ग्रामस्थांना तंबी दिली जाते. १ जून २३ च्या तहकुब ग्रामसमेत ‘मी सांगेन तेच ऐका, अन्यथा ग्रामसभेच्या बाहेर व्हा’, अशा प्रकारे दमदाटी करून प्रश्न विचारणाºया नागरिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामसभेपुर्वी जमाखर्च पत्रक वाटण्यात येऊ नये असे ग्रामसभेत सरपंचाने मान्य केले. त्याचप्रमाणे सदर सभेमध्ये मग्रारोहयोचा सन २०२४- २५ चा आराखडा मंजुर करण्यातआला नाही व जमाखर्च पुढील सभेत सादर करणार असे सांगीतले.

परंतु आजपर्यंत उर्वरीतविषयावर ग्रामसभा आयोजीत केली नाही. सरपंच सुचीता चंद्रशेखर पडोळे यांचे घराचे वॉल कपाऊंड सार्वजनिक रस्त्याच्या जागेत येत असल्यामुळे व अश्विनी रूमदेव माकडे यांचे सुध्दा घराचे बांधकाम शासकीय जागेत आहे. त्यामुळे दोघांचेही सदस्य पद रिक्त करण्यात यावे. ग्रामपंचायत कर्मचारी व ग्राम विस्तार अधिकाºयांवर सरपंच मॅडम खोटे काम करण्याकरीता दबाव आणून प्रशासनाची दिशाभूल करीत आहेत. यामुळे अशा सरपंचावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. दिनांक १/६/२०२३ ला सरपंच सुचिता चंद्रशेखर पडोळे यांनी जाहीर केले की, मी कमीशनचे रुपए २२,५०० / – (रु. बावीस हजार पाचशे) घेतली व सदर रक्कम उपसरपंच सामंत सुखदेवे यांच्या नावाने नमुना ७ पावती फाडुन ग्रामपंचायतच्या सामान्य फंडात जमा केली असे मान्य केले.

लाच व कमशिन घेणाºया सरपंचावर कलम ३९ अन्वये कारवाई करून पद रिक्त करण्यात यावे, अशी आमची ग्रामवासीयांची मागणी आहे. ग्राम विस्तार अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्यासोबत अरेरावी करणाºया व विनयभंगाची धमकी देणाºया त्या महिला सरपंचावर तात्काळ प्रशासकीय कारवाई करून अपात्र घोषीत करण्यात यावे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जि.प.सदस्य इत्यादीना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे. निवेदनावर माजी सरपंच निर्भय क्षीरसागर, माजी सरपंच दुलीचंद देशमुख, माजी ग्राम पंचायत सदस्या निराशा गजभिये, ओमप्रकाश कांबळे, ईश्वर कळंबे, जागेश्वर बडगे तसेच ग्रा. सदस्य अमित पडोळे, ग्रा.पं. सदस्य समिर गभणे, ग्रा.पं. सदस्या सविता धनराज कुंभलकर, ग्रा.पं. सदस्य कमलेश कार्तिकराम अहिर, ग्रा.पं. सदस्या कुंदा विलास चोपकर, शालु उमेश तिरपुडे, दुर्गा ताराचंद साखरवाडे, प्रकाश हुमणे, रविकांत गजभिये, सुहास गजभिये, तिरुत्तम कळंबे, नरेंद्र लकडे इत्यानीची स्वाक्षरी आहे.

महिला सदस्यांच्या पतीची अरेरावी

यात ग्रामपंचायत सदस्य सरोजीनी गौतम मेश्राम व त्यांचे पती गौतम मेश्राम यांनी ग्रामस्थांना शिविगाळ केली. तसेच माजी सरपंच निर्भय क्षीरसागर यांना शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे गैरवर्तणुक करणाºया महिला सदस्या व अरेरावी करणाºया पतीवरही फौजदारी व प्रशासकीय कारवाई करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.