कोरोना- जिल्हयात क्रियाशील रुग्णांचे द्विशतक

प्रतिनिधी गोंदिया : कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण जिल्ह्यात वाढतांना दिसत आहे.आज ७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सात व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असल्याचा अहवाल गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे.तर सात रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात आज आढळलेल्या सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यातील बाधित रूग्णांची एकूण संख्या ४९५ झाली आहे.क्रियाशील रुग्ण संख्या २०५ वर पोहचली आहे. आज सात रुग्ण आढळून आले असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील दोन रुग्ण आणि गोंदिया शहरातील शास्त्री वार्डातील एक रुग्ण, सडक/अर्जुनी येथील एक रुग्ण,आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध येथील एक रुग्ण आणि तिरोडा तालुक्यातील बिरसी येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या आता २०५ वर पोहचली आहे.

जिल्ह्यात कोरोना या आजा- रावर मात करून आज सात रुग्ण घरी परतले आहे. यामध्ये देवरी तालुक्यातील पुराडा येथील दोन रुग्ण आणि चिचगड येथील एक रुग्ण,गोंदिया शहरातील हनुमाननगर व सिव्हिल लाईन येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि आमगाव तालुक्यातील घाटटेमनी आणि तिगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यातील २५७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण १०६१६ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये ९९३९ नमुने निगेटिव्ह आढळून आले. ४५२ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.८२ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे.तर १४३ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *