प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त : पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

भं.प्र.प्रतिनिधी नागपूर : कोरोनाशी लढण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती पाहिजे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त असुन त्यांचा आहारात समावेश केल्याने आरोग्यसंपन्न राहता येईल असे मत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज व्यक्त केले. रानभाज्यांना ओळख मिळवून त्यांची विक्री व्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होवून शेतकºयांना फायदा व्हावा अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विदयमाने आज रविनगर शासकीय वसाहतीतील मैदानात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, सहसंचालक कृषी रविंद्र भोसले, जिल्हा कृषी अधिक्षक मिलींद शेंडे, संचालक आत्मा नलीनी भोयर उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

चिंब पावसातही आज नागरीकांनी मोठया प्रमाणावर रानभाज्या महोत्सवात भाज्यांची खरेदी केली. त्यामध्ये श्रावणातील पालेभाज्यांची व रानफळांची विशेष रेलचेल होती. चंदनबटवा, अळु, अंबाडी, समुद्र घोष, चिवई, गावरानी कोहळे, सुरण, काटवे ल, गुळवेल, शेवगा, बांबु आस्ते, खापरखुटी, चंदनबटवा, केना, कुंजीर यासारख्या रानभाज्यांचा समावेश होता. रानभाज्या महोत्सवातील सर्वच भाज्यांचे औषधी गुणधर्मासह त्यांच्या पाककृतीची माहिती स्टॉलवर लावल्याने नागरीकांनी उत्साहाने भाज्या खरेदी केल्या. एकुण १४ स्टॉल वर २५० च्या वर भाज्या व रानफळ उपलबद्ध होत्या. रानभाज्या महोत्सवाने शेतकºयांना आर्थिक उत्पन्न मिळेल व शहरी जनतेला देखील रानभाज्यांची ओळख होईल. कृषी विभागाने हा उपक्रम दरवर्षी राबवण्याची सूचना पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी केली. महोत्सवाला जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपवनसंरक्षक प्रभुदयाल शुक्ल यासह अनेक वरीष्ठ अधिकाºयांनी देखील भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *