राज्यात गुरुवारपासून पावसाची शक्यता

  भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : कोकणातील मान्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. गुरुवारपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी यासंबंधीचे ट्विट केले आहे. होसाळीकर यांनी म्हटले आहे की, २३, २४ जूनला संपूर्ण कोकणात व्यापक स्वरूपात पाऊस पडणार आहे तर, २२ ते २४ जून या काळात उत्तर आणि दक्षिण कोकण, विदर्भातील बºयापैकी भागांत पावसाची शक्यता आहे.

संपूर्ण मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. पुढील ७२ तासांमध्ये मान्सून मुंबई-पुण्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने सोमवारी वर्तविला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीवह्य झाल्यामुळे मान्सून आणखी सकिह्यय होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे रत्नागिरीमध्ये मान्सूनचा थांबलेला प्रवास पुढे सरकून पुढील तीन दिवसांमध्ये मान्सून मुंबईत येऊ शकतो, असे हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.