रोजगार हमी योजनेचे कामावर भोवळ येऊन पडलेल्या मजुराचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील मेंढा येथील रोजगारहमी योजनेचे कामावर भोवळ येऊन पडलेल्या मजुरास उपचाराकरता गोंदिया व गोंदिया वरून नागपूर येथे नेले असता नागपूर येथे उपचारा दरम्यान या मजुराचा मृत्यू झाला.

मेंढा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे लघु पाटबंधारे उपविभाग तिरोडा तर्फे सुरू असलेले नाला सरळीकरण व साठवण बंधा-याचे सुरू असलेले कामावर दिनांक १६ रोजी मेंढा येथील ३२ वर्षीय शरद रघुनाथ बिसेन जॉब कार्ड नंबर ६८८, मस्टर क्रमांक १०१५६ हा इसम काम करत असताना भोवळ येऊन पडल्याने इतर मजुरांनी लगेच त्यास उपचारा करता प्राथमिक आरोग्य केंद्र सुकळी (डाक) येथे नेले मात्र तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे गोंदिया येथे रुग्णालयात पाठवले असता प्रकृती चिंताजनक असल्यामुळे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नागपूर येथे उपचाराकरीता पाठवले असता उपचार सुरू असताना १९ जून रोजी संध्याकाळचे दरम्यान सदर युवकाचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर त्याचे शव मेंढा येथे आणून २० जून रोजी या मृतक मजुरावर मेंढा स्मशान घाटावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. या मजुराचा रोजगार हमी योजनेचे कामावर मृत्यू झाला असून त्याचे मागे पत्नी, आई-वडील, दीड व तीन वर्षाच्या दोन मुली आहेत. मृतक हा कुटूंबातील एकटाच कमावता असल्यामुळे त्याचे परिवारास त्वरित शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य विजय बिंझाडे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.