कोरोनामुळे आयएमएच्या १९६ डॉक्टरांचा मृत्यू

प्रतिनिधी मुंबई : देशातील कोरोनाचा कहर आटोक्यात येत नसताना या विषाणूमुळे कोरोना योध्यांनाही जीव गमवावे लागत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या १९६ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही बाब धक्कादायक आणि चिंताजनक आहे. कोरोनाशी लढणारे योध्दाच मृत्युमुखी पडत असल्याने आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे, असे म्हणत आयएमएने ७ आॅगस्टला पंतप्रधानांना एक पत्र पाठवले आहे. त्यानुसार आपल्या अडचणी मांडत डॉक्टरांचे मृत्यू रोखण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी दिली आहे.कोरोना हा सर्वात वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. अशावेळी डॉक्टर हे थेट रुग्णांच्या संपर्कात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *