वाघाच्या कातडीसह दोघांना अटक

भंडारा पत्र्रिका / प्रतिनिधी पवनी : वाघाच्या कातडीची तस्करी करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना निलज फाटा येथे पकडण्यात वन विभागाला यश आले असून आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई नागपूर व भंडारा वनविभागाने बुधवार दिनांक २१ जूनला सकाळी १० वाजता केली आहे. वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर व भंडारा येथील वनविभागाच्या पथकाने सापळा रचून आरोपींना मुद्देमालासह पकडले. यात आरोपींकडे असलेली वाघाची कातडी व अ‍ॅक्टिवा दुचाकी क्रमांक – एमएच ३४ सीबी-२७१७ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपितांवर वनअधिनियम (वन्यजीव) १९७२ अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई नागपूर व भंडारा वनविभागामार्फत संयुक्तरित्या करण्यात आली असून रमेश कुमार मुख्य वनसंरक्षक नागपूर यांचे मार्गदर्शनात भरत सिंह हाडा उप वनसंरक्षक नागपूर, राहुल गवई उप वनसंरक्षक भंडारा, पी. जि. कोडापे वन्यजीव वनाधिकारी दक्षता पथक नागपूर, वाय. बी. नागुलवार सहाय्यक वनसंरक्षक भंडारा, एच. डी. बारसागडे वनपरिक्षेत्राधिकारी पवनी, प्रमोद वाडे वनपरिक्षेत्राधिकारी बुट्टीबोरी, संजय मेंढे वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा तसेच अधिनस्थ अधिकारी व कर्मचारी फिरते पथक भंडारा यांनी संयुक्तरित्या केली. पुढील तपास राहुल गवई उपवनसंरक्षक भंडारा यांचे मार्गदर्शनात एच. डी. बारसागडे वनपरिक्षेत्राधिकारी पवनी करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.